तेव्हा फक्त बाळासाहेबांच्या शिवसेने मुळे माझे प्राण वाचले – अमिताभ बच्चन

मुंबई : दिवंगत हिंदुहृदयसम्राट  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित  सिनेमा ‘ठाकरे’चं काल टीझर रिलीज करण्यात आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि बिग बी अमिताभ बच्चन यांच्या उपस्थित या सिनेमाचं पोस्टर आणि टीझर लाँच करण्यात आलं. या कार्यक्रमादरम्यान, बोलताना बिग बी अमिताभ बच्चन यांनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला.

Loading...

शिवसेनेच्या रुग्णवाहिकेने प्राण वाचवले!
१९८२ साली ‘कुली’ चित्रपटाच्या सेटवर मला अपघात झाला. मी बंगळुरूला बेशुद्ध पडलो होतो. मला त्याच अवस्थेत विमानातून मुंबईला आणले. मुंबईत तुफान पाऊस होता. विमानतळावरून मला ब्रीच कँडीला न्यायचे होते. पावसामुळे परिस्थिती कठीण होती. एकही अॅम्ब्युलन्स येऊ शकत नव्हती, पण विमानतळाबाहेर फक्त आणि फक्त शिवसेनेची अॅम्ब्युलन्स उभी होती. जर शिवसेनेची अॅम्ब्युलन्स तेव्हा आली नसती तर आणखी गंभीर प्रसंग ओढवला असता अशी आठवण अमिताभ यांनी सांगितली.

अमिताभ बच्चन यांचं भाषण जसंच्या तसं

बाळासाहेबांसोबत माझं कायमच कौटुंबिक नातं होतं. त्यांचा कोणत्याही कार्यक्रम असला की ते मला नेहमी बोलवायचे. आजही मी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलो कारण की, बाळासाहेब ठाकरेंशी निगडीत हा कार्यक्रम आहे. पण याला दुसरंही एक कारण आहे. ते म्हणजे संजय राऊत यांची लेखणी. कधीकधी त्यांची लेखणी मला तलवारीसारखी वाटते आणि त्याच्या भीतीनंच मी इथं आलो. दरम्यान, हा सिनेमा फक्त तीन तासापुरता मर्यादित ठेऊ नका. या सिनेमाचे अनेक भाग यावेत अशी माझी इच्छा आहे. कारण की, फक्त तीन तासात बाळासाहेब समजून घेता येणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर एखादी वेब सीरीज तयार व्हावी अशी माझी इच्छा आहे.

‘मी ज्या दिवसापासून  बाळासाहेबांना भेटलो. तेव्हापासून त्यांना वाटलं की, मी त्यांच्या कुटुंबातीलच कुणीतरी एक आहे. जवळजवळ 40 वर्षापूर्वी माझी त्यांच्याशी भेट झाली होती. त्याच दरम्यान, माझं लग्न झालं होतं. तेव्हा त्यांनी मला आणि माझ्या पत्नीला घरी येण्याचं निमंत्रण दिलं. मी जेव्हा ‘मातोश्री’वर गेलो. त्यावेळी ‘माँ’ने ज्यापद्धतीनं जयाचं स्वागतं केलं ते मला आजही लक्षात आहे. स्वत:च्या सुनेचं स्वागत करावं तसं स्वागत त्यांनी जयाचं केलं होतं. त्या दिवसापासून मी बाळासाहेबांना वडिलांप्रमाणे मानू लागलो.’

‘अनेकदा बाळसाहेब कुटुंबाप्रमाणे माझ्या पाठिशी उभे राहिले. अनेक गोष्टी अशा आहेत की, ज्या आजवर कुणालाही माहित नाही. तशा त्या फार वैयक्तिक आहे म्हणा… 1982मध्ये कुली सिनेमाच्या शुटींगदरम्यान मी गंभीर जखमी झालो होतो. तेव्हा बंगळुरुतील एका रुग्णालयात अनेक दिवस मी बेशुद्ध अवस्थेत होतो. तेव्हा पुढील उपचारासाठी मला मुंबईत आणायचं ठरलं. त्यानंतर तिथून विमानानं मला मुंबईला आणलं. तेव्हा मुंबईत जोरदार पाऊस सुरु होता. त्यावेळी विमानतळावरुन थेट मला ब्रीच कॅण्डी रुग्णालयात नेलं जाणार होतं. पण तेव्हा एकही रुग्णवाहिका उपलब्ध नव्हती. त्यावेळी बाळासाहेबांच्या शिवसेनेची रुग्णवाहिका माझ्यासाठी धावून आली होती. त्या रुग्णवाहिकेमुळे मी वेळेत ब्रीच कॅण्डीला पोहचू शकलो आणि माझ्यावर वेळीच उपचार झाले. म्हणून मी त्यांचा कायम ऋणी राहिन. कारण जर ती रुग्णवाहिका त्यावेळी तिथं आली नसती तर माझी अवस्था आणखी बिकट झाली असती.’Amitabh Bachchan's Kuli Accident
‘माझ्या आयुष्यात अनेक चढ-उतार यायचे. त्यावेळी बाळासाहेब नेहमी माझ्यासोबत असयाचे. अनेकदा माझ्यावर काही आरोपही व्हायचे त्यावेळी बाळासाहेब मला फोन करुन विचारायचे. हे चूक आहे की बरोबर?. एकदा माझ्यावर आणि माझ्या कुटुंबांवर असाच एक आरोप झाला होता. त्यावेळी त्यांनी मला फोन करुन मातोश्रीवर बोलावून घेतलं आणि विचारलं की, हे आरोप खरे आहेत का? मी त्यांना सांगितलं की, हे आरोप चुकीचे आहेत. त्यानंतर त्यांनी तडक मला सांगितलं. आता घाबरु नकोस, मी तुझ्यासोबत आहे.  एवढा धीर त्यावेळी दुसरा कोणत्याच व्यक्तीनं मला दिला नाही.’
‘बाळासाहेब जेव्हा शेवटच्या क्षणी जेव्हा अंथरुणाला खिळले होते तेव्हा त्यांच्या खोलीत जाण्याची परवानगी मला उद्धव यांनी दिली. एका प्रबळ व्यक्तीला जेव्हा आपण अशा अवस्थेत बघतो त्यावेळी अक्षरश: हेलावून जातो. तेव्हा आम्ही प्रार्थना करत होतो की, ते पुन्हा एकदा जिवंत व्हावे. तो क्षण मी कधीही विसरु शकत नाही. मला कधीही वाटत नव्हतं की, मी त्यांना अशा अवस्थेत पाहिन. पण त्यावेळी मी आणखी एक आश्चर्याची गोष्ट त्यांच्या खोलीत पाहिली. मला माहिती होतं की, बाळासाहेबांचं माझ्यावर प्रेम होतं. पण मी पाहिलं की, ते जिथे झोपले होते तिथे त्यांच्या उजव्या बाजूला एक फोटो होता. तो फोटो माझा होता. ते दृश्य पाहून मला फार भरुन आलं. ती घटना कायम माझ्या स्मरणात राहिल. मी त्यांना शतश: नमन करतो. या सिनेमासाठी कधीही कोणत्याही प्रकारची मदत हवी असल्यास मला आवर्जून सांगा. मी माझ्या परिने होईल तेवढी मदत करेन.’

अखेर नवाजुद्दिन सिद्द्कीच साकारणार बाळासाहेब ठाकरेंची भूमिका; सिनेमाचा ट्रीझर लॉच

 

1 Comment

Click here to post a commentLoading…


Loading…

Loading...