कोरोना मृत्यूसंबंधीच्या ‘त्या’ बातम्या चुकीच्या ; केंद्राने दिले स्पष्टीकरण

corona

मुंबई : अमेरिकेतील नवीन अध्ययनानुसार भारतात जानेवारी २०२० ते जून २०२१ दरम्यान कोरोनाने जवळपास ५० लाख लोकांचा मृत्यू झाला असावा. असा अंदाज व्यक्त केला होता. भारतामध्ये ५० लाख इतक्या मोठ्या प्रमाण रूग्णांनी जानेवारी २०२० ते जून २०२१ या कालावधीत जीव गमावला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचे जीव जाणे ही देशाच्या स्वातंत्र्योत्तर इतिहासात भारत पाक फाळणीनंतरची सर्वात मोठी दुर्घटना असल्याचे अमेरिकेत झालेल्या एका अभ्यासातून समोर आले होते.

परंतु आता केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनामुळे मृत्यू पडलेल्यांची संख्या जी दाखवली जाते आहे, ती फार कमी असून प्रत्यक्षात ती संख्या त्यापेक्षा कैकपटीने जास्त असल्याचा दावा केला जातो आहे. काही माध्यमांनीही तसेच वार्तांकन केले आहे. मात्र हे दावे चुकीचे आणि भ्रम निर्माण करणारे असल्याचे नमूद करत सरकारकडून ते फेटाळण्यात आले आहेत.

याबाबत आपली भूमिका स्पष्ट करताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की देशात मृत्यू नोंदणी केली जाते. ती यंत्रणा पाहता काही आकडे कमी जास्त होउ शकतात. मात्र ज्या प्रमाणात मृत्यूंची नोंदणी झाली नसल्याचा दावा केला जातो आहे, तो चुकीचा आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात मृत्यू झाले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. कोरोना काळात भारतात अनेक जणांना प्राण गमवावे लागले आहेत. ही संख्या मिलियन्सच्या अर्थात दशलक्षाच्या पटीतली असल्याचे दावे काही विदेशी माध्यमांनी केले आहे. तशाच बातम्या देशांतील माध्यमांतूनही प्रसारित झाल्या आहेत. मात्र हे सगळे चुकीचे आणि भ्रम निर्माण करणारे असल्याचे सरकारचे म्हणणे आहे.

दरम्यान काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारवर यावरूनच बुधवारी निशाणा साधला होता. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत देशात ५० लाख भारतीयांचा मृत्यू झाला, असा आरोप राहुल गांधी यांनी केला. देशात करोना संसर्गाने आतापर्यंत ४.१८ लाखा रुग्णांचा मृत्यू झाल्याचा अधिकृत आकडा सरकारने दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

IMP