fbpx

#पक्षांतर : ते वृत्त खोटंं आहे, मी कॉंग्रेस सोडणार नाही, कॉंग्रेसच्या आमदाराचा खुलासा

टीम महाराष्ट्र देशा : विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर अनेक कॉंग्रेस नेत्यांनी सत्ताधारी भाजप-सेनेत प्रवेश केला आहे. तर अनेक नेते शिवसेना – भाजपच्या वाटेवर असल्याचं दिसत आहे. राज्यात पक्षांतरच्या बातम्या दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे काही बातम्या या अफवा असल्याच म्हंटल जात आहे. अशीच एक बातमी म्हणजे कॉंग्रेस नेते अनंत गाडगीळ यांच्या शिवसेना प्रवेशाची आहे.

अनंत गाडगीळ यांनी शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यामुळे अनंत गाडगीळ हे लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे वृत्त आले होते. मात्र अनंत गाडगीळ यांनी हे वृत्त फेटाळले आहे. मी काँग्रेसमध्येच कायम राहणार असून, शिवसेनेत जाण्याचा कोणताही इरादा नाही. मुलाच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी ‘मातोश्री’वर उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, असे त्यांनी उद्धव ठाकरे भेटीचे स्पष्टीकरण दिले.

दरम्यान काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार अनंत गाडगीळ यांनी शुक्रवारी ‘मातोश्री’वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. त्यानंतर माध्यमांमध्ये त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरु झाल्या. अनंत गाडगीळ यांची विधानपरिषदेची मुदत पुढच्या वर्षी संपत असल्यामुळे आतापासूनच अनंत गाडगीळ शिवसेना प्रवेशाची मोर्चेबांधणी करत असल्याचं म्हटलं जात होतं.