पिशोर पोलिसांकडून ‘त्या’ खुनाचा उलगडा

औरंगाबाद : तीन महिन्यान पासून खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या पाच जणांना अटक करण्यात करण्यात आली आहे. कचरू रामा बडवे, योगेश कचरू बडवे, किसन रामा बडवे, काळूबा रामा बडवे (सर्व. रा.पिशोर), बापू शंकर राऊत (रा. मोहंद्री) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहे. तर एक जन फरार आहे.

हा खून प्रेमसंबंधाच्या रागातून झाला असल्याचे तपासात समोर आले आहे.  माळेगाव धनगर (ता,कन्नड) येथील डोंगरात 27 डिसेंबर 2020 रोजी योगेश लक्ष्मण राऊत (वय 22) या तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. यासंबंधित पिशोर पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मयत योगेश  (ता. 05 डिसेंबर) सकाळपासून बेपत्ता होता. त्याचा शोध घेत असताना रविवारी (ता.06 डिसेंबर) रोजी आईचा खोरा नावाने ओळखल्या जाणाऱ्या डोंगरात फॉरेस्ट कंपार्टमेंट क्र. 81 मध्ये आप्पाराव बोराडे यांना डोंगर उतारावर झाडाझुडपात अर्धनग्न अवस्थेत आढळून आला होता.

पोलिस पाटील सूर्यभान राऊत यांनी पिशोर पोलिसांना घटनेची माहिती दिली होती. त्या  मृतदेहाला शवविच्छेदणासाठी पाठविण्यात आले. त्यात गळा आवळ्याचे नमूद असल्याने गुन्हा दाखल करत तपासाची सूत्रे फिरवत पाच आरोपींना अटक करण्यात आली असून एक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या :