‘म्हणजे याचा अर्थ भाजपच्या किरीट सोमय्यांचं मूल्य 550 कोटी रुपये’

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पीएमसी घोटाळ्याबाबत केलेले आरोप मला मान्य नाहीत. आम्ही असले फालतू धंदे करत नाही. मी पाटलांवर सव्वा रुपयाचा दावा ठोकणार आहे, कारण पाटील यांची लायकी सव्वा रुपयाचीच आहे. अशी टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. त्यावरुन सेना-भाजपमध्ये पुन्हा एकदा नवा वाद पेटला आहे. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारवर शरसंधान साधले आहे.

संजय राऊत म्हणतात, ‘भाजपच्या चंद्रकांतदादा पाटीलांच्या विरोधात सव्वा रुपयाचा मानहानीचा खटला दाखल करतील कारण त्यांचे मूल्य सव्वा रुपया आहे.’ मग ठाकरे सरकारमधील नेते माझ्या विरोधात बदनामी झाली म्हणून 550 कोटी रुपयांचे खटले दाखल करतात त्याचा अर्थ काय? भाजप किरीट सोमय्या यांचे मूल्य 550 कोटी रुपये आहे, असं कीरीट सोमय्या आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले आहेत.

दरम्यान, तुमच्या पत्नीला पीएमसी बँक घोटाळ्यातून निघालेले पन्नास लाख रुपये मिळाले आणि या बेहिशेबी प्राप्तीबद्दल चौकशीसाठी ईडीने नोटीस बजावल्यानंतर तुम्ही हैराण झाला होता. मी अंदाज बांधला की पन्नास लाखांसाठी एवढा त्रास होत असेल तर १२७ कोटींसाठी नक्कीच फेस येणार. असे चंद्रकांत पाटील राऊतांच्या टीकेला उत्तर देताना म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या