‘ते इस्लामोफोबिक वक्तव्य’ मोईन अलीच्या वडीलांची नाराजी

मोईन अली

लंडन : चेन्नई : येत्या 9 एप्रिलपासून इंडियन प्रीमियर लीगचे 14 वे सीजन सुरु होणार आहे. मात्र IPL सुरु होण्यापूर्वीच या सामन्यावर कोरोनाचे सावट पडले आहे. दरम्यान नेहमीच आपल्या वक्तव्यांमुळे चर्चेत असलेल्या बांगलादेशच्या बंडखोर लेखिका तस्लिमा नसरीन यांनी एक ट्विट करत वादग्रस्त विधान केलं होत.

यावर त्यांनी स्पष्टीकरण दिले मात्र क्रिकेट विश्वातील हरहुन्नरी क्रीडापटूचा थेट दहशतवादी संघटनेशी संबंध जोडल्याने जगभरातील चाहते खवळले आहेत. तसेच क्रिकेट जगतातून देखील यांच्यावरती टीका करण्यात आली आहे. यामध्ये मोईन अलीच्या वडीलांची नाराजी व्यक्त केली असून

नसरीन यांच्या वक्तव्यावर मुनीर अली यांनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी ‘इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं की,  त्यांचं ते ‘इस्लामोफोबिक’ वक्तव्य आहे. त्यांनी आरशात पाहिलं असतं तर आपण काय वक्तव्य केलं आहे, हे त्यांना समजलं असतं. एका मुस्लीम व्यक्तीच्या विरुद्ध केलेलं हे टिपिकल आणि स्पष्टपणे इस्लामोफिबक वक्तव्य आहे. ज्या व्यक्तीकडं स्वत:चा आत्मसन्मान नाही तसंच त्याच्या मनात दुसऱ्याबद्दल सन्मान नाही. अशीच व्यक्ती या स्तरापर्यंत खाली घसरु शकते, असे मुनीर अली यांनी सांगितलं.

मुनीर अली पुढे म्हणाले की, ‘खरं सांगायचं तर मी खूप रागात आहे. पण मला माहिती आहे की माझा राग अनावर झाला तर मी त्यांच्यासारख्या लोकांच्या हातामधील खेळणं बनेल. त्यांची कधी प्रत्यक्ष भेट झाली तर मी माझं मत त्यांना सांगेल. सध्या मी त्यांना एक शब्दकोश निवडण्याची आणि त्यामधील उपहासाचे अर्थ पाहण्याचा सल्ला देईल.’ असे देखील ते म्हणाले.

महत्वाच्या बातम्या