…म्हणून मोदी ‘घड्याळ’ उलटे घालतात

indian-pm-narendra-modi

मुंबई : बॉलिवूड कलाकार अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी मुलाखात घेतली आहे. या मुलाखातीत अक्षय कुमारने मोदी यांना काही प्रश्न विचारले आहेत. मोदींकडूनही या प्रश्नांना उत्तम प्रतिसाद मिळला .

अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींना मुलाखतीदरम्यान त्यांच्या घड्याळ घालण्याच्या सवयीसंदर्भात प्रश्न विचारला. ‘मी अनेकदा पाहिलयं की तुम्ही घड्याळ उलटं घालता, म्हणजे घड्याळाचे डायल आतल्या बाजूला असते असं का?’, असा सवाल अक्षयने मोदींनी विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना मोदींनी मी अशाप्रकारे घड्याळ घालण्यामागे एक विशेष कारण असल्याचे सांगितले.

‘मी अनेकदा बैठकींमध्ये असतो. त्यावेळी किती वेळ झाला हे पाहण्यासाठी जर मी भेटायला आलेल्या व्यक्तीसमोर घड्याळ पाहिले तर तो त्यांना त्यांचा अपमान झाल्यासारखे वाटू शकते. म्हणूनच मी उलट्या पद्धतीने घड्याळ घातलो कारण वेळ बघायचा झाल्यास मी लोकांसमोर हात वर न करता हळूच वेळ पाहतो,’ असं स्पष्टीकरण मोदींनी दिले.

दरम्यान, तरुणपणी मला सैन्यात भरती होण्याची इच्छा होती. लहानपणापासून मला वाचनाची आवड होती, असे त्यांनी सांगितले. मी कधी पंतप्रधान होईन असे वाटलेही नव्हते. मी सर्वसामान्य कुटुंबातून आलो असून माझी कौटुंबिक पार्श्वभूमी पाहता मला एखादी नोकरी मिळाली असती तर माझ्या आईने गावात साखर वाटली असती, असे मोदींनी सांगितले.Loading…
Loading...