महावीर जयंती: गौतम बुद्धांचा फोटो शेअर केल्याने शशी थरूर झाले ट्रोल

शशी थरूर यांना ट्रोल करताना नेटकरी मंडळींनी केले गमतीदार ट्वीटस

टीम महाराष्ट्र देशा- ट्विटरवरून महावीर जयंतीच्या शुभेच्छा देताना चुकीचा फोटो शेअर केल्याने काँग्रेस नेते शशी थरूर ट्रोल झाले आहेत . आज संपूर्ण देशभरात महावीर जयंती उत्सहात साजरी होत असताना भगवान महावीर यांच्या फोटोऐवजी चक्क तथागत गौतम बुद्धांचा फोटो ट्विटरवर शेअर करण्याचा प्रताप थरूर यांनी केला आहे.

कोणताही सण ,महापुरुषांची जयंती- पुण्यतिथीची संधी साधून नेतेमंडळी शुभेच्छा देण्यासाठी तसेच अभिवादन करण्यासाठी फारच उतावळे असल्याचं नेहमीच पहायला मिळत. याच उतावळे पणातून काही अशाच चुका घडत असतात मात्र नेटकरी अश्या चुकांना माफ करत नाहीत याचाच प्रत्यय आज थरूर यांना आला आहे.

शशी थरूर यांनी ट्विटर अकाउंटवर हॅप्पी महावीर जयंती असं ट्विट केले. ट्विटसोबतच त्यांनी एक फोटो शेअर केला. थरूर यांनी हे ट्विट केल्यानंतर काही युजर्सनी फोटो चुकीचा असल्याचं त्यांच्या निदर्शनास आणून दिलं.

आज महावीर जयंती आहे. परंतु, शशी थरूर यांनी भगवान महावीर यांच्या फोटोऐवजी चुकून तथागत गौतम बुद्धांचा फोटो ट्विटरवर शेअर केला आणि त्यांना ट्रोलर्सचा सामना करावा लागला पाहूया यातील काही गमतीदार ट्वीट .