राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्याक्षकांनी मानले सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार…

एक वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे त्यांनी राज्यातील रस्त्यांची दुरवस्था सरकारला दाखवण्यासाठी सोशल मीडियावर सेल्फी विथ पॉटहोल्स ही मोहीम सुरू केली होती.मात्र, एका वर्षांनंतरही राज्यातील रस्त्यांची अवस्था ‘जैसे थे’च असल्याने सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकार विरोधात ‘सेल्फी विथ पॉटहोल्स’ ही मोहीम सुरु केली. या मोहिमेत अनेक राष्ट्रवादीच्या नेत्यांनी सहभाग घेतलाय.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही काही दिवसांपूर्वी सांगली – पेठ रस्त्याच्या खड्डयांंसोबत सेल्फी काढले होते. या सेल्फिची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने ते खड्डे बुजवण्याचे काम त्वरित सुरु केले. याबद्दल जयंत पाटील यांनी ट्वीट करून सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार मानले आहेत.

जयंत पाटील यांनी नेमक काय म्हटल आहे ?

माझ्या सेल्फिची दाखल घेऊन सांगली – पेठ रस्ताचे काम त्वरित सुरु केल्याबद्दल सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार ! अशीच दाखल  selfie with potholes या मिहीमेतील प्रत्येक सेल्फिची घेऊन राज्यातील सर्व नादुरुस्त रस्त्यांचे काम त्वरित पूर्णत्वास न्यावे, हि आग्रहाची विनंती !