जे कॉमन सेन्सनं होऊ शकलं नाही, ते गुजरातच्या निवडणुकीनं करून दाखवलं – चिदंबरम

टीम महाराष्ट्र देशा : २११ वस्तूंवरील जीएसटी कमी करण्याच्या निर्णयाच स्वागत करताना देशाचे माजी अर्थमंत्री पी. चिदंबरम यांना भाजप सरकारला उपरोधिक टोला लावला आहे.

केंद्र सरकारनं घेतलेल्या या निर्णयाबद्दल विरोधकांनी मोदी सरकारचं अभिनंदन करणं अपेक्षित होतं. मात्र, चिदंबरम यांनी या निर्णयाबद्दल गुजरातचे आभार मानणारं मार्मिक ट्विट केलं आहे. ‘गुजरातला धन्यवाद! जे संसदेला जमलं नाही. जे कॉमन सेन्सनं होऊ शकलं नाही, ते गुजरातच्या निवडणुकीनं करून दाखवलं,’ असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

You might also like
Comments
Loading...