मुंबई विमानतळावर विमान लँडिंग करणाऱ्या वैमानिकाचे आभार माना : हायकोर्ट

Mumbai flight started

मुंबई : मुंबई मध्ये निर्धारित उंचीपेक्षा जास्ती उंचीच्या इमारती सध्या उभारत आहेत त्यामुळे विमानतळावर सुरक्षित लँडिंग करणाऱ्या वैमानिकाचे आभार मानूनच विमानाबाहेर पडायला हवं, अशी सध्या परिस्थिती निर्माण झाल्याची चिंता मुंबई उच्च न्यायालयानं व्यक्त केली आहे. त्याचबरोबर आखून दिलेल्या आराखड्यात इमारती उभारल्या जात नसल्याची चिंता देखील व्यक्त केली आहे.

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या धावपट्टीभोवती वाढलेल्या बेकायदेशीर बांधकामांमुळे लँडिंग ही गंभीर समस्या झाली आहे. त्यावर तोडगा काढून सुरक्षित टेक ऑफ आणि लँडिंगसाठी सुरक्षित धावपट्टी उपलब्ध करुन देणं, हीदेखील आता हायकोर्टाचीच जबाबदारी बनल्याचा टोलाही न्यायालयानं यावेळी लगावला. आरटीआय कार्यकर्ता केतन तिरोडकर यांनी यासंदर्भात दाखल केलेल्या जनहित याचिकेवर न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरु आहे