ठाणेदार योगेश पारधी यांचा धडाका, 40 दुकानांवर दंडात्मक कार्यवाही करुन केले सिल

Lockdown

वर्धा : सकाळी 9 ते 5 सायंकाळी वाजेपर्यंत दुकाने सुरु ठेवण्याचे आदेश असतांना सकाळी 7 वाजता पासुन दुकाने सुरु केल्या प्रकरणी पोलिस विभागाने ठाणेदार योगेश पारधी यांचे नेतृत्वात 40 दुकांनावर दंडात्मक कार्यवाही करुन दुकाने सिल केली.

अमरावतीत मृतकांचे थ्रोट स्वॅब का घेतले जात नाहीत? न्यायालयाची जिल्हा प्रशासनाला विचारणा

कोरोना विषाणु प्रादुर्भाव वर्धा शहरात होऊ नये याकरीता खबरदारीच्या उपाय योजना म्हणुन जिल्हाधिकारी विवेक भीमनवार यानी जिल्हयातील (औषध दुकाने वगळता) सर्व दुकाने सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरु राहतील असा आदेश काढलेला आहे.

सदर आदेशाचे उल्लंघन करुन दुकानदारांनी आपले दुकाने 5 जुन रोजी सकाळी 7 वाजता पासुन सुरु केली त्यामुळे दुकाने सिल करुन दंडात्मक कार्यवाही पोलिस विभागाकडून करण्यात आली.

प्रशासन आणि डॉक्टरांची मेहनत फळाला आली, तुळजापूर तालुका झाला कोरोनामुक्त

कार्यवाही करण्यात आलेल्या दुकानामध्ये विजय हेमराज भाटिया टायर्स दुकान, सुनिल मानकर, स्टील दुकान, रविंद्र मात्रे, आर.के. डेली निड्स, स्वाती मात्रे सचिन किराणा, उमेश रंगारी मनिष किराणा, सचिन मेश्राम नास्ता दुकान, जिहान शेख हिंदुस्थान ट्रंकमर्च, महेश पाटील पुष्प भंडार, सुनिल टेंभुरकर ऑटोरिपेरिंग सेंटर, वैशाली पाटील गृह उद्योग, श्याम कावळे न्यु समाधान उपहारगृह, हरिश्चद्र आकरे पंचशिल उपहार गृह, महेंद्र दोशी निधी किराणा, मुकेश खोब्रागडे दत्तकृपा हॉटेल, वैभव कोमलकर हार दुकान, सुरज चौधरी सुरज ईलेक्ट्रीक, सुनिता कोठारे नंदनी ट्रेडर्स, पवन चौधरी साई लस्सी, महेद्र दोशी निधी किराणा, बळवंत चौधरी पवन सुपर शॉपी, रमेश तुरण किर्ती किराणा, सुभाष तडस गुरुदेव किराणा, गणेश वाटकर नास्ता बंडी, प्रविण पाटील नगर आर्किटेक्चर, नरेश व्यवहारे , संजय जगताप , नाफिजा जाकिर ताजचहा सेल, फिरोज शमशेर पठाण भंगार दुकान, हरिदास चौधरी पान मंदिर, पांडूरंग चिन्हास्वामी नास्ता दुकान, मनोज गावंडे नास्ता बंडी, कृष्णकुमार शुक्ला , शरद काबंळे संकल्प कापड दुकान, शकिल रिजवी टिंबर मार्ट , चंद्रकांत मुडे हार्डवेअर, अमोल देवघरे , नईम शेख चहा कॅटिंन, सुधाकर कोल्हे नास्ता दुकान, सतिश चाफले नास्ता दुकान या दुकानाचा समावेश आहे.