ठाण्यात जुन्या नोटा बाळगल्याप्रकरणी पाच जणांना अटक

ठाणे: ठाण्यामध्ये ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेने कारवाई करत कोटी ९८ लाख रुपये किंमतीच्या जुन्या नोटा हस्तगत केला आहेत. यावेळी ठाणे गुन्हे मध्यवर्ती शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे यांनी स्कोडा गाडीसह ५ जणांना अटक केली. गुन्हे शाखेच्या पथकाने या अगोदर ठाण्याच्या हरिनिवास परिसरात जुन्या पाचशे आणि एक हजाराच्या नोटा बदलण्यासाठी आलेल्या उमेश शिर्सेकर (वय २८, रा. कळवा, विटावा) याला अटक केली होती. बुधवारी सकाळी गुन्हे मध्यवर्ती शाखेच्या पथकाने मानपाडा परिसरातून चलनातून बाद झालेल्या जुन्या १ कोटी ९८ लाख ५० हजार रुपयांच्या १ हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा जप्त केल्या आहेत. गुन्हे मध्यवर्ती शाखेने सापळा रचून १ स्कोडा गाडीसह ५ जणांना या नोटांसह ताब्यात घेतले.