अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची ठाणे महापालिकेने भरपाई द्यावी

thane rain

ठाणे : ठाणे महापालिका हद्दीत २९ ऑगस्टला झालेल्या अतिवृष्टीमुळे ठाणेकरांचे अतोनात नुकसान झाले आहे. अनेकांचे संसार रस्त्यावर आले आहेत. बहुतांश लोकांच्या वाहनांचे नुकसान झाले आहे. काही दुदैवी मृत्यूदेखील झाले आहेत. या सर्वांना ठाणे महापालिकेने नियमानुसार नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मनसेचे संदीप पाचंगे यांनी ठाणे मनपा आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली आहे.

अतिवृष्टी झाली असली तरी अनेक ठिकाणी अपूर्ण नालेसफाई, भुयारी गटार योजनेचे नसलेले नियोजन अशीही मुख्य कारणे आहेत. मुंबई प्रांतिक अधिनियम 1949 च्या कलम 133-अ अन्वये आयुक्तांच्या अधिकाराचा त्यांनी वापर करुन मालमत्ता करमाफी द्यावी  तसेच त्यांना नुकसान भरपाई आर्थिक स्वरुपात द्यावी अशी मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.   रस्ता रुंदीकरण  व अनधिकृत बांधकाम विरोधात कठोर कारवाई ही ठाणे मनपा आयुक्तांची ओळख आहे. तरी शासनाने केलेल्या तरतुदी नुसार आयुक्त संजीव जयस्वाल यांनी तातडीने पुरग्रास्तांना मदत द्यावी, अशी मागणी संदीप पाचंगे यांनी केली आहे.