fbpx

अपमानाच्या बदल्यासाठी ‘मनसे पॅटर्न’, मनसैनिकाने केली ‘ठाकरे’ची 1000 तिकिटे बुक

abhijeet panse

ठाणे: ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी सुरु झालेले मानपानाचे नाट्य काही केल्या थांबताना दिसत नाही, दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या समर्थनार्थ सोशल मिडीयावर मोहीम राबवणाऱ्या मनसैनिकांनी आता थेट संपूर्ण सिनेमागृहाचे तिकीट बुक केले आहे. ठाण्यातील मनसे पदाधिकारी महेश कदम यांनी वंदना चित्रपट गृहाची १००० तिकिटे बुक केली आहेत.

मनसे नेते अभिजित पानसे यांनी ठाकरे सिनेमा दिग्दर्शित केला आहे. या सिनेमाचं स्पेशल स्क्रीनिंग मुंबईत आयोजित करण्यात आले होते. यावेळी मानपानाचे नाट्यरंगले. स्क्रीनिंगवेळी सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना जागा न मिळाल्याने पानसे नाराज झाले, त्यामुळे ते स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले होते. दरम्यान, आता हा वाद आणखीनचं वाढला आहे. सोशल मीडियावर मनसेच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी #ISupportAbhijitPanse नावाची मोहीमही सुरु केली आहे. त्यावरुन मनसे कार्यकर्ते अभिजीत पानसेंचं समर्थन करण्यासह शिवसेनेवर टीकाही करत आहेत.

मनसे पदाधिकारी महेश कदम यांनी १००० तिकिटे बुक करत ठाण्यातील मनसे कार्यकर्त्यांना चित्रपट पाहण्यासाठी येण्याचे आवाहन केले आहे. तसेच अभिजित पानसे हे देखील चित्रपट पाहण्यास येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.

लहान मेंदूत कचरा साचला की… संजय राऊत यांचा पानसेंवर निशाणा

ठाकरे चित्रपटाच्या स्क्रीनिंगवेळी रंगलेल्या मान-अपमान नाट्यानंतर आता मनसे आणि शिवसेनेत शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पहायला मिळत आहे. खा. संजय राऊत यांनी केलेल्या ट्विटनंतर आता हा वाद आणखीन वाढल्याच दिसत आहे. ‘लहान मेंदूत अहंकाराचा कचरा साचला की संयम आणि कृतज्ञता या शब्दांचे मोल नष्ट होते. ठाकरे चित्रपटाचा हाच संदेश आहे’, असे ट्विट जय राऊत यांनी केलेआहे. या ट्विटच्या माध्यमातून राऊत यांनी दिग्दर्शक अभिजित पानसेंवर निशाणा साधल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

राजसाहेब बरोबर बोलले होते, अभिजित हे तुला फसवणार – मनसे

 ठाण्याचे मनसे नेते अविनाश जाधव यांनी अभिजित पानसे यांना समर्थन देत ट्वीट केले आहे. यामध्ये ‘आज परत तेच झालं..शिवसेनेने अभिजित पानसेचा वापर केला, पहिल्यांदा आदित्य ठाकरेला तयार करण्यासाठी आणि आज ठाकरे सिनेमा बनवण्यासाठी… राज साहेब बरोबर बोलले होते अभिजित हे तुला फसवणार’.. असे ट्वीट मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी केले आहे.