आदिवासी वसतिगृहातील विद्यार्थ्यांचे थाळी बजाव आंदोलन

पुणे : शासनाच्या भोंगळ कारभारा विरोधात आज शासकीय आदिवासी वसतिगृहातील हडपसर ( आकाशवाणी ) , पुणे येथिल मुलांनी थाळी बाजाव आंदोलन केले.

आदिवासी वसतीगृहामधील विद्यार्थांना निष्कृठ दर्जाचे जेवण मिळत असून शासनाच्या कोणत्याच नियमांची अमलबजावणी होत नाही. त्यामुळे काल शनिवार पासून वसतिगृहातील विद्यार्थी उपोषणाला बसले होते. मात्र कोणत्याही अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांची चौकशी केली नाही. त्यामुळे आज संतापून विद्यार्थांनी वसतिगृह प्रशासना विरोधात थाळी बाजाव आंदोलन केले.

सदर विद्यार्थांशी सवांद साधला असता शुभम सुपे म्हणाला गेली कित्येक दिसपासून जेवण नीट मिळत नसल्यामुळे आम्ही वारंवार तक्रारी करून सुद्धा अधिकाऱ्यांनी आमच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले. वसतिगृहात वॉर्डन नाहीत. नियमित स्वच्छता होत नाही. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात. तसेच वस्तीगृहाची वेबसाईट बंद असल्यामुळे नवीन मुलांचे प्रवेश रखडले आहेत.

आदीवासी वस्तीगृहाचे गृहपाल राजकुमार रख यांच्याशी सवांद साधण्याचा प्रयन्त केला असता त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.