जनतेच्या भावना सरकारकडे पोहचवत आहोत- ठाकरे

मुंबई- नोटबंदीवरुन शिवसेनेने आज पुन्हा एकदा तलवार उपसली आहे. टोकाची भूमिका घेण्यास मी मागे-पुढे पाहणार नाही, असा स्पष्ट इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिला.जनतेच्या डोळ्यात अश्रू असताना भावूक होण्यात काय अर्थ आहे, असा प्रश्न उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केला. तसंच सव्वाशे कोटी जनतेचा निर्णय एक व्यक्ती घेऊ शकत नाही. नोटबंदीआधी जनतेला विश्वासात घेणं गरजेचं होतं, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. “माजी पंतप्रधान मनमोहन सिंह हे नावाजलेले अर्थतज्ज्ञ होते, त्यामुळे त्यांचे मत गांभीर्याने घ्यावेच लागेल.

You might also like
Comments
Loading...