ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावरच सोडून गेले निघून

टीम महाराष्ट्र देशा – दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे सिनेमाचं मुंबईत स्पेशल स्क्रीनिंग होत आहे. या स्क्रीनिंगमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक अभिजित पानसे यांच्या कुटुंबीयांना पुढच्या रांगेत बसवल्यामुळे पानसे नाराज झाले आणि दिग्दर्शक स्क्रीनिंग अर्ध्यावर सोडून निघून गेले. त्यामुळे या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये मानपानाचे नाट्य चांगले रंगले.

मुंबईत होणाऱ्या या स्पेशल स्क्रीनिंगसाठी दिग्गज नेते आणि इतर मान्यवरांना निमंत्रण देण्यात आलेलं होत. पण ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शकच नाराज झाल्यामुळे या स्पेशल स्क्रीनिंगमध्ये मानपानाचे नाट्य चांगले रंगलेले पाहायला मिळाले.
अभिजित पानसे यांना सर्वात पुढचं सीट दिल्यामुळे ते नाराज झाले असल्याचे बोलले जात आहे. यावेळी खासदार संजय राऊत यांनी पानसेंची समजूत काढण्याचाही प्रयत्न केला. परंतु त्यात त्यांना यश आलं नाही. पानसे कुटुंबासह घरी निघून गेले.अभिजित पानसे हे ठाकरे सिनेमाचे दिग्दर्शक तर आहेतच. त्यासोबत ते मनसेचे नेतेही आहेत.

दरम्यान, ठाकरे सिनेमात बाळासाहेबांच्या आयुष्यातील संपूर्ण प्रवास दाखवलं आहे. हिंदी आणि मराठी या दोन्ही भाषांमध्ये ठाकरे सिनेमा 25 तारखेला रिलीज होतोय.