नगरमध्ये दहाव्या जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेचा शुभारंभ

अहमदनगर : शहरातील वाडियापार्क क्रीडा संकुल येथे अहमदनगर जिल्हा थायबॉक्सिंग असोसिएशन आयोजित दहाव्या जिल्हास्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेचा शुभारंभ नगरसेवक संपत बारस्कर यांच्या हस्ते झाला.स्पर्धेसाठी जिल्ह्यातील ४१० खेळाडूंचा उत्सफुर्त प्रतिसाद लाभला.विशेष म्हणजे प्रत्येक तालुक्यातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले होते. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अमीत पवार हे होते. यासह मुख्य प्रशिक्षक घनश्याम सानप, सचिव दिनेश गवळी, जयसिंग काळे आदींसह खेळाडू व पालक उपस्थित होते. मुख्य प्रशिक्षक घनश्याम सानप प्रास्ताविक करतांना म्हणाले की, खेळात मार खावा लागतो व द्यावाही लागतो. जय-पराजय हा मुद्दा गौण असून खेळाने जीवनात संघर्ष करण्याची ऊर्जा मिळत असल्याचे सांगितले.तसेच स्पर्धे साठी आलेल्या ग्रामीण भागातील खेळाडूंना त्यांनी शास्त्रोक्त पध्दतीने खेळाची माहिती दिली.संपत बारस्कर म्हणाले की,शासकीय नोकरीमाध्ये खेळाडूंना प्राधान्य दिले जात असून,अनेक खेळाडूंना शासकीय नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत.खेळाने शरीर व मन सृदढ बनते.शरीर सक्षम असेल तर कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करता येते.स्वत:चे शरीर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी मैदानी खेळ खेळणे आवश्यक आहे.संसर्गजन्य रोग देखील ज्याची प्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांना लवकर होतो.खेळाडूंना सहजा-सहजी अशा संसर्गजन्य रोगांची लागण होत नाही.घनश्याम सानप यांनी शहरात अनेक खेळाडू घडविले आहेत.यामधूनच एखादा खेळाडू ऑलंम्पिंक मध्ये पदक मिळवेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.या स्पर्धेतील विजयी खेळाडूंना सातारा येथे होणा-या राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेसाठी जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी पाठविण्यात येणार आहे. जयसिंग काळे यांनी आभार मानले