Share

Chandrashekhar Bawankule | “ठाकरेंची मशाल पंजाच्या हातात”; चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका

भंडारा : भंडारा येथे भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याला मार्गदर्शन करण्याकरिता बावनकुळे हे भंडारा येथे आले असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे यांनी केवळ मुख्यमंत्रीपदाची खुर्ची मिळवण्यासाठी हिंदुत्वाचा मुद्दा सोडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा हात हातात घेतला. उद्धव ठाकरे यांना मिळालेली मशाल हे चिन्ह आता काँग्रेसच्या हातात असल्याची अशी घणाघाती टीका भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ठाकरेंवर केली.

ठाकरेंची मशाल पंजाच्या हातात

उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले, ज्या तत्वाच्या जोरावर त्यांनी पक्ष स्थापन केला त्या विचारापासूनच ते दूर गेले आहेत. त्यामुळे त्यांना कोणतंही चिन्हं मिळालं तरी त्यांना मतं देणार नाहीत. अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. “उद्धवजी तुमची मशाल हिंदुत्वाच्या हाती नसून ती आता पंजाच्या आहे” असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

उद्धव ठाकरे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या दावणीला बांधून हिंदुत्वापासून दूर गेलेत. विचारसरणीला बाजूला ठेवत नवी विचारसरणी आत्मसात करून ठाकरेंची सुरू असलेली राजकीय वाटचाल ही अस्तित्वहीन होत आहे. यावेळी बावनकुळे यांनी सामनातून झालेल्या टीकेवरही सडतोड उत्तर दिले. आगामी काळात पक्षाची उमेदवारी हवी असल्यास प्रत्येक कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे. त्यांचे कार्य बघूनच त्यांना उमेदवारी आणि ए बी फार्म देण्यात येईल, असे कार्यकर्ता मेळाव्यात बावनकुळे बोलले.

लोकसभेच्या 45 आणि विधानसभेच्या 200 जागा जिंकण्याचे उद्दिष्ट भाजपने ठेवले असून त्यादृष्टीने पक्ष बांधणी सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्यातील विधानसभेच्या तिन्ही जागा भाजपा जिंकेल यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असेही बावनकुळे बोलले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लम्पी आजाराची लागण झाल्याची खोचक टीका बावनकुळे यांनी करताना आगामी विधानसभा निवडणुकीत त्यांचे डिपॉझिट जप्त होणार असल्याचे भाकीत देखील केले आहे.

महत्वाच्या बातम्या :

भंडारा : भंडारा येथे भाजपाचा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. याला मार्गदर्शन करण्याकरिता बावनकुळे हे भंडारा येथे आले असताना …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now