‘ठाकरे सरकारला १०० कोटी आकडा भलताच प्रिय दिसतोय, भाजपचा टोला’

atul bhatkhalkar

मुंबई: राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कुटुंबाने १२७ कोटींचा घोटाळा केला असून २७०० पानांचा पुरावा इन्कम टॅक्सला दिल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. यावरूनच हसन मुश्रीफ यांनी ‘सोमय्या यांच्यावर फौजदारी १०० कोटींचा दावा दाखल केला आहे. यावरूनच भाजपचे नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.

‘किरीट सोमय्यांविरोधात फौजदारी अब्रू नुकसानीचा १०० कोटींचा दावा दाखल करणार असे हसन मुश्रीफ म्हणतायत. या सरकारला १०० कोटी आकडा भलताच प्रिय दिसतोय.’ असा खोचक टोला अतुल भातखळकर यांनी ट्वीट करत लगावला आहे.

दरम्यान भाजपचे किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफ यांची पत्नी आणि मुलावर मनी लाँडरिंगचे आरोप केले असून त्यांनी बोगस कंपन्या दाखवून बेनामी संपत्ती जमवल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावरच हसन मुश्रीफ यांनी सोम्य्यांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या :