…तेव्हा हेक्टरी २५ हजार रुपये द्या, असं म्हणणाऱ्या ठाकरेंनी आता पंचनामे सोडून त्वरित मदत करावी

raju shetti vs uddhav thakrey

इचलकरंजी : परतीच्या पावसाने महाराष्ट्रात धुमशान घातले आहे. पश्चिम महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्रात पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झाले आहे. खर तर मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा करून लोकांना धीर देणे अपेक्षित होते मात्र घरात बसून मुख्यमंत्री कारभार हाकत असल्याने जनतेमध्ये नाराजी वाढू लागली आहे.

राज्यात परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. पिकांची आणि मालमत्ता नुकसानीबाबत माहिती घेतानाच त्यांनी सर्व यंत्रणांना मनुष्यहानी होऊ नये यासाठी सतर्क राहण्याचे निर्देशही दिले आहेत मात्र तरीही लोकांमध्ये नाराजी वाढतच आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष व माजी खासदार राज्य शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्यांनी मागील सरकार काळात शेतकऱ्यांसाठी केलेल्या मदतीच्या मागणीची आठवण करून दिली आहे. ‘ शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये द्या अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली होत, त्यावेळी ते मुख्यमंत्री नव्हते. मात्र आता ते मुख्यमंत्रीपदावर आहेत. आता पंचनामे बाजूला ठेऊन त्यांनी मोडून पडलेल्या शेतकऱ्याला आधार द्यावा तसंच भरीव आर्थिक मदत द्यावी” अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

“परतीच्या पावसाने मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये प्रचंड नुकसान झालंय. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून नेलाय. शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. पूर, चक्रीवादळ आणि आता ओला दुष्काळ यासारख्या संकटातून शेतकरी जात आहे. त्यामुळे राज्य सरकारने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून त्यांना लगोलग मदत करावी”असं राजू शेट्टी म्हणाले आहेत.

ओला दुष्काळ जाहीर करा

“गेल्या 3 ते 4 दिवसांत पावसाने अक्षरश: हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालंय. त्याला आता सरकारच्या मदतीची गरज आहे. अशावेळी सरकारने ओला दुष्काळ जाहीर करुन बळीराजाला तातडीने मदत देऊन आधार द्यावा,” अशी मागणी देखील शेट्टींनी सरकारकडे केली आहे.

महत्वाच्या बातम्या-