पुणे : ५ ऑक्टोबर रोजी मुंबईत शिवतीर्थ मैदानावर उद्धव ठाकरे गटाचा दसरा मेळावा तर बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे गटाचा दसरा मेळावा पार पडला. मेळाव्यादरम्यान दोन्ही गटांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एकही संधी सोडली नाही. ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शनही करण्यात आले. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सडकून टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे. फडणवीस पुण्यात माध्यमांशी बोलत होते.
उद्धव ठाकरे यांचे भाषण नेहमीप्रमाणे तेच-ते होते. ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी कधीही मुख्यमंत्र्याचे भाषण केले नाही, ते पक्षप्रमुख म्हणूनच भाषण करीत होते. आम्हाला त्याचा कंटाळा आला असल्याचं देवेंद्र फडणवीस माध्यमांशी म्हणाले. “त्यांनी आता आपला स्क्रिप्ट राईटर बदलावा,” असा सल्लाही देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
खरी शिवसेना आमचीच असल्याचा दावा शिंदे गट आणि ठाकरे गट नेहमी करत असतात. यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात देखील गेली आहे. मात्र कुणाच्या सभेला जास्त होणार यावरून खरी शिवसेना कोणाचा हे ठरणार असल्याचं म्हंटल जात होतं. यावर देखील फडणवीस यांनी भाष्य केलं आहे. खरी शिवसेना कुणाची हे एकनाथ शिंदेंनी कालच्या मेळाव्यातून दाखवून दिले. “ठाकरेंच्या मेळाव्यापेक्षा शिंदेंच्या मेळाव्याला दुपट्ट गर्दी होती,” असे फडणवीस म्हणाले. “येत्या महापालिका निवडणुकीत शिंदेंचाच भगवा फडकणार,” असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पहिल्याच दसरा मेळाव्याला बुधवारी बीकेसी मैदानात विक्रमी दीड लाखाची गर्दी जमवण्यात शिंदे गट यशस्वी झाला आहे. तर दुसरीकडे मात्र उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्याला शिंदे गटाच्या मेळाव्यापेक्षा कमी गर्दी असल्याचं चित्र पाहायला मिळालं. फडणवीस यांच्या या टीकेला उद्धव ठाकरे काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- BJP | ‘बापाच्या नावाने थापा’; ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर भाजपचा पलटवार
- New Smartphone Launch | Motorola चा ‘हा’ नवीन स्मार्टफोन होणार 7 ऑक्टोबरला लाँच
- Eknath Shinde | “एकनाथ शिंदे मान खाली करुन भाजप…”, शिवसेनेचा हल्लाबोल
- Eknath Shinde | “आनंद दिघेंचा मृत्यू झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी विचारलं…”, एकनाथ शिंदेंचा आरोप
- Ravi Rana । “उद्धव ठाकरे यांची सभा म्हणजे फुसका बार”; रवी राणांचा हल्लाबोल
‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले