BJP VS Shiv Sena । मुंबई : राज्यात ओबोसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाल्यानंतर आता महानगरपालिका आणि नगरपालिकांच्या निवडणूका काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे. शिंदे गट स्वतःला खरी शिवसेना समजू लागल्यामुळे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यातच आता आगामी निवडणूक शिवसेना- भाजप सोबत लढणार आहे. शिंदे गटाचे खासदार राहुल शेवाळे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजप एकत्र लढणार आहेत. उद्धव ठाकरेंनी आमच्यासोबत यावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. एकिकडे सुप्रीम कोर्टात शिवसेनेतील उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे गटात सुरू असलेल्या सत्ता संघर्षाबाबतची खटल्याची सुनावणी महत्त्वाच्या टप्प्यावर येऊन ठेपली असताना उद्धव ठाकरेंना शिंदेसेनेत सहभागी होण्याचे आवाहन शिंदे गटातर्फे केले गेले आहे. त्यामुळे शिवसेना यावर काय प्रतिक्रिया देते, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
दरम्यान, दुसरीकडे शिंदे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लवकरात लवकर होणार असल्याचे संकेत येत आहेत. दीपक केसरकर म्हणाले कि, मला ज्या प्रमाणे वरिष्ठ सांगतात तसं मी सांगत असतो. चार दिवसात होईल अस सांगितलं तेव्हा मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं. काही कारणामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा वेळ वाढला. मुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील तेव्हाच विस्तार होईल. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या जवळपास निश्चित होत असतात. मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यपालांना कळवतील, असंही ते सांगितलं.
तर याआधी मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, लवकरच आम्ही आमच्या मंत्रिमंडळाचा विस्तार करणार आहोत. पूर्ण मंत्रिमंडळ नसले तरी सरकार सक्षमपणे काम करत आहे. आम्ही असे अनेक निर्णय घेतले आहेत जे लोकाभिमुख आहेत. एकनाथ शिंदे यांनी 30 जून रोजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, मात्र महिना उलटूनही मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला नाही. यावरून विरोधी पक्षांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Ambadas Danve | “जे गेले ते परत येण्यासाठी संपर्क करत आहेत” ; अंबादास दानवेंचे मोठे विधान
- 5G Internet | या महिन्यात सुरु होणार 5G इंटरनेट सेवा?, पहा ‘ही’ कंपनी करणार 5G लाँच
- Deepak Kesarkar । दिल्लीच्या वाऱ्या वाढल्या म्हणजे मंत्रिमंडळाच्या याद्या निश्चित होतात – दीपक केसरकर
- Chhagan Bhujbal | ED प्रकरणात लवकर जामीन मिळत नाही – छगन भुजबळ
- Sunil Raut | संजय राऊत यांना उद्धव ठाकरेंपासून तोडण्याचा प्रयत्न सुरु – सुनील राऊत
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<