‘ठाकरेंनी भाजपसोबत बॅक टू पॅव्हेलियन येत फडणवीसांना मुख्यमंत्री करावे’, आठवलेंचा सल्ला

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. या बैठकीविषयी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की ही बैठक राजकीय नसून वैयक्तिक होती. पंतप्रधानांशी त्यांचे चांगले संबंध आहेत असे सांगण्यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा माध्यमांनी त्यांना पीएम मोदी यांच्या भेटीविषयी विचारले, तेव्हा ते म्हणाले की, ‘पंतप्रधानांना भेटण्यात काय चूक आहे, मी कोणत्या नवाझ शरीफला तर भेटायला गेलो नव्हतो.’

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, ‘आम्ही जरी राजकीयदृष्ट्या एकत्र नसलो तरी याचा अर्थ असा नाही की आमचे नाते तुटले आहे. त्यामुळे जर का मी पंतप्रधानांची वैयक्तिकरित्या भेट घेतली तर त्यात चूक काय आहे?’

दरम्यान, रिपाईंचे नेते तथा केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी या भेटीच्या अनुषंगाने उद्धव ठाकरेंना सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरेंना माझा प्रस्ताव आहे. त्यांनी बॅक टू पव्हेलियन यावं. भाजपसोबत सरकार स्थापन करावं. शिवसेना, भाजप आणि आरपीआयची युती महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेणारी आहे’ असा विश्वासही त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला. शिवसेना आणि भाजपची 30 वर्षांपासूनची मैत्री होती. उद्धव ठाकरे यांनी या मैत्रीचा विचार करावा. भाजपसोबत यावं आणि मोठ्या मनाने देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP