fbpx

 सोलापुरात ‘ठाकरे’ हाऊसफुल्ल,शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांकडून जल्लोषात स्वागत

सोलापूर- ( प्रतिनिधी ) – महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिक आणि मराठी पासून ज्याची आतुरतेने वाट पाहत होता, तो हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा बायोपिक असलेला ‘ठाकरे’ चित्रपट शुक्रवारी राज्यभरात प्रदर्शित झाला. सोलापुरात ‘ठाकरे’चित्रपटाचे दणक्यात प्रमोशन झाले. शहरातील बहुतांश सर्वच चित्रपटगृहात ‘ठाकरे’ प्रदर्शित झाल्यानंतर शिवसेनेच्या वेगवेगळ्या गटांकडून चित्रपटाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

शिवसेनेचे शहराध्यक्ष हरिभाऊ जाधव यांनी भागवत चित्रमंदिर येथे शिवसैनिकांच्या उपस्थितीत बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून केक कापला आणि जल्लोष केला. तर शिवसेनेचे नेते पुरुषोत्तम बरडे यांच्या कार्यकर्त्यांनी उमा चित्रपटगृहात आनंदोत्सव साजरा केला. माजी शहराध्यक्ष व उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण यांनी प्रभात चित्रपटग्रह येथे मिरवणुकीने जाऊन ‘ठाकरे’ पाहिला .

कामगार सेनेचे प्रमुख विष्णू कारमपुरी यांनी पूर्व भागातील गेंटयाल चित्रपटगृह येथे ढोल ताशाच्या गजरात ‘ठाकरे’ चित्रपटाचे स्वागत केले. सोलापुरातील सर्वच चित्रपटगृहात शुक्रवारी ‘ठाकरे’ हाऊसफुल्ल असल्याचे पाहावयास मिळाले. अगदी चित्रपट सुरुवात झाल्यापासून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना झिंदाबादच्या घोषणांनी चित्रपटगृह दणाणून गेले होते.