ठाकरेंनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला; बावनकुळेंनी दिला अल्टिमेटम

chandrashekhar bawankule

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत काल महत्वाचा निर्णय दिला आहे. ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर निवडणुकांना स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. निवडणुका घेण्याचा किंवा पुढे ढकलण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला आहे, राज्य सरकारला नाही, असं सर्वोच्च न्यायालयाने मत नोंदवलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी आता 23 सप्टेंबर 2021 रोजी पार पडणार आहे.

यावर माजी मंत्री आणि ओबीसी नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देताना महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. संविधानाप्रमाणे निवडणूक आयोगाला निवडणुका घ्याव्या लागतात. पण, राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुका पुढे ढकलून राज्यातील ओबीसी जनतेची दिशाभूल केलीय. निवडणुका या वेळेवरच होणार आहेत. आता ओबीसी समाजाला न्याय मिळेल की नाही? हा प्रश्न निर्माण झाला आहे,’ असं बावनकुळे यांनी म्हटलंय.

यासोबतच, ‘मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वांझोट्या बैठका घेतल्या आणि वेळकाढूपणा केला. आता सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे सरकारला झटका दिला. निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली. त्यामुळे आता ओबीसी जनतेला न्याय मिळेल की नाही, हा प्रश्न आहे. पण आताही तीन महिन्यात इम्पेरीकल डाटा गोळा करुन ओबीसींना आरक्षण द्यावं. नाहीतर राज्यातील ओबीसी समाज या सरकारच्या मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही. तसेच भाजप या सरकार विरोधात तिव्र आंदोलन करणार,’ असा इशारा देखील चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या