मुंबई : अंधेरी पोट निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग येत आहे. रमेश लटके यांच्या निधनानंतर या निवडणुका होत असून त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके महाविकास आघाडीला पाठिंबा देत आहेत. त्यामुळे त्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजेच मशालच्या उमेदवार होणार आहेत. मात्र, अंधेरी पूर्व विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा वाद काही केल्या संपण्याचं नाव घेत नाहीये. अशातच भाजपच्या वतीने अर्ज भरलेले मुरजी पटेल (Muraji Patel) यांच्या उमेदवारी अर्जावर ठाकरे गटाकडून आक्षेप घेण्यात आला आहे.
आधी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके (Rutuja Latke) यांचा राजीनामा मंजूर होत नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर न्यायालयाच्या आदेशानंतर लटके यांचा राजीनामा बीएमसीने मंजूर केला. त्यांचा तर दुसरीकडे भाजपकडून उमेदवार म्हणून चर्चेत असलेल्या मुरजी पटेल यांनी मतदारसंघात जोरदार प्रचारही सुरु केला होता. मात्र, अंधेरी पूर्व विधासभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाने उभे केलेले उमेदवार मुरजी पटेल यांच्या उमेदवारीवर ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. माजी नगरसेवक संदीप नाईक यांच्याकडून हा आक्षेप घेण्यात आला आहे. ‘मुरजी पटेल यांनी त्यांच्या गुन्ह्यांची माहिती लपवली’, असा आरोप संदीप नाईक यांनी केला आहे. पटेलांविरोधात काही पुरावेही निवडणूक आयोगाला देणार असल्याचा दावा देखील संदीप नाईक यांनी केला आहे.
उद्धव ठाकरे यांची डोकेदुखी वाढवणारी गोष्ट म्हणजे ऋतुजा लटकेंविरोधात २४ उमेदवार रिंगणात आहेत, भाजपच्या मुरजी पटेल यांनी दोन अर्ज दाखल केले आहेत. एक अर्ज बाद ठरला, तर बाहेर फेकले जाण्याची नामुष्की टाळण्यासाठी खबरदारी म्हणून पटेल यांनी भाजपकडूनच दोन अर्ज भरले आहेत. तर ठाकरेंच्या शिवसेनेकडूनही दोन अर्ज भरण्यात आले आहेत. दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके उमेदवार आहेत. पण सावधगिरी म्हणून संदीप नाईक यांचा अर्ज भरण्यात आला आहे.
दरम्यान, सर्व अर्जांची आज छाननी होणार आहे. सोमवार १७ ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. आलेल्या २५ अर्जांमधून आता किती उमेदवार माघार घेतात याची उत्सुकता आहे. या निवडणुकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहेच. मात्र शिंदेंचं बंड आणि सत्तांतर यानंतर होणारी ही पहिलीच निवडणूक असल्याने संपूर्ण राज्याचं लक्ष याकडे लागलं आहे. आगामी मुंबई महापालिकेची समीकरणं यावर ठरतील. तसंच मतदारांचा कौलही समजणार आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Historical moment | भारतीय महिला क्रिकेट संघाने रचला इतिहास! सलग 7व्यांदा जिंकला आशिया कप
- Deepak Kesarkar | ‘50 खोके एकदम ओक्के’ म्हणून डिवचणाऱ्या ठाकरे गटावर दीपक केसरकरांचा हल्ला
- Ajit Pawar | एकनाथ शिंदेंचा राष्ट्रवादीला झटका! अजित पवारांनी मंजूर केलेला निधी शिंदे-फडणवीस सरकारने रोखला
- Diwali 2022 | दिवाळीच्या दिवशी आकर्षक दिसण्यासाठी ‘हे’ कलर कॉम्बिनेशन करा आपल्या जोडीदारासोबत
- Deepak Kesarkar | “दोन दिवसांनंतर अवघ्या महाराष्ट्राला समजेल की खोके कोणी घेतले अन्…”, दीपक केसरकरांचा इशारा