Share

Naresh Mhaske | “ठाकरे गटाने निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर केले”, नरेश म्हस्केंचा गंभीर आरोप

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं वळण मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवले आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे अंधेरी (पूर्व) मध्ये पोट निवडणुकीपर्यंत निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह कोणालाच वापरता येणार नाहीय. एवढंच नाही तर कोणत्याच गटाला शिवसेना पक्षाचं नावही लावता येणार नसल्याचं आयोगाकडून सांगण्यात आलं आहे. अशातच शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे.

काय म्हणाले नरेश म्हस्के ?

उद्धव ठाकरे यांच्या गटाने निवडणूक आयोगाकडे बनावट कागदपत्र सादर केली असल्याचा गंभीर आरोप नरेश म्हस्के यांनी ठाकरे गटावर केला आहे. नरेश म्हस्केंच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसेच नरेश म्हस्के यांनी यासंदर्भात आपल्या ट्विटर आकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये यांनी हे म्हटलं असल्याचं समजतं आहे.

त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, शिल्लक सेना शिल्लक ठेवण्यासाठी ही पातळी गाठता? निवडणूक आयोगाकडे बनावट प्रतिज्ञापत्र सादर करता?. अरे, बाळासाहेबांच्या प्रतिमेची तरी लाज बाळगा रे. याचबरोबर म्हस्के यांनी ठाण्यातील निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाल्याची एक एफआयआरची प्रत देखील जोडली असल्याचं पाहायला मिळतं आहे.

दरम्यान, शनिवारी बनावट शपथपत्र तयार केल्याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या कारवाईत चार हजार 682 प्रतिज्ञापत्रे पोलिसांना सापडली आहेत. मुंबई पोलिसांनी अशीच कारवाई माहिम व अंधेरी येथेही केली आहे. आरोपींनी बनावट शिक्क्यांचा वापर केल्याचा संशय असून याबाबत पोलीस अधिक तपास करत असल्याची माहिती समोर आली आहे.

महत्वाच्या बातम्या :

मुंबई : शिंदे गट आणि ठाकरे गटातील वादाला आत वेगळं वळण मिळालं आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचे ‘धनुष्यबाण’ हे …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Politics