Uddhav Thackeray | मुंबई : एकनाथ शिंदे यांनी बंड करुन शिवसेना पक्षावर दावा केला. त्यामुळे प्रकरण कोर्टात गेलं आणि कोर्टाने एकनाथ शिंदे यांना दिलासा देत हे प्रकरण निवडणूक आयोगाला दिल्यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का भेटला. निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव आणि चिन्ह गोठवलं. अशातच आता निवडणूक आयोगाने (Election Commision) पुन्हा प्रतिज्ञापत्रा बाबत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गटाला झटका दिला आहे.
खरी शिवसेना कोणाची हे सिद्ध करण्यासाठी ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून पक्षाच्या लाखो सदस्यांच्या मार्फत पाठिंब्याची प्रतिज्ञापत्रे जमा केली जात आहेत. निवडणूक आयोगाने ठरवून दिलेल्या विहीत नमुण्यामध्येच ही प्रतिज्ञापत्र सादर करणे आवश्यक होते. मात्र शिवसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांकडून विहीत नमुण्यामध्ये प्रतिज्ञापत्र सादर न करण्यात आल्यानं ही प्रतिज्ञापत्र बाद ठरवण्यात आली आहेत.
साडेआठ लाख सदस्यत्वाचे अर्ज आणि प्रतिज्ञापत्रे ठाकरे गटाकडून दिल्ली कार्यालयात पाठविली आहेत. प्रत्यक्षात ठाकरे गटाकडे ११ लाख प्रतिज्ञापत्रे तयार होती. मात्र आयोगाने ती बाद ठरवली असती म्हणून ही प्रतिज्ञापत्रे ठाकरे गटाने आयोगाला पाठविलीच नाहीत.
दरम्यान, 11 लाखापैकी दोन ते अडीच लाख प्रतिज्ञापत्र आयोगाच्या विहित नमुन्यात नसल्याने निरुपयोगी ठरली आहेत. तरीदेखील साडेआठ लाख प्रतिज्ञापत्रे आयोगाकडे जमा करण्यात ठाकरे गटाला यश मिळाले आहे. मात्र, उर्वरीत प्रतिज्ञापत्रांमुळे ठाकरे गटाला झटका बसण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Prasad Lad | “दाऊतच्या मांडीवर बसलेल्या शरद पवारांसोबत युती करणाऱ्यांनी…”, प्रसाद लाड यांचा किशोरी पेडणेकरांवर हल्लाबोल
- Eknath Shinde | जुनी मैत्री की राजकीय खेळी?, शिंदे गटाकडून ठाकरे गटाला दिवाळीच्या शुभेच्छा
- Aditya Thackeray | “खोके सरकार नंतर आता घोषणा सरकार”, आदित्य ठाकरे कडाडले
- Vishwajeet Kadam | “महाराष्ट्राला लागलेलं ग्रहण घालवण्याची गरज आहे”, विश्वजीत कदमांचा भाजपला टोला
- Shinde-Fadanvis Govt | वर्षावर खलबतं! देवेंद्र फडणवीस रात्री उशिरा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला