Shivsena | मुंबई : राज्यात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे-फडणवीस सरकारवर सामना मुखपत्राच्या संपादकीय लेखातून सडकून टीका करण्यात आली आहे. “पेंद्रातील सत्ताधारी आणि राज्यात सत्तेवर असलेले मिंधे सरकार आश्वासनांची आतषबाजी तर जोरात करीत आहे, पण जनतेच्या जीवनातील अंधार कायमच आहे. ‘अच्छे दिन’ची दिवाळी कुठे हरवली? अर्थव्यवस्थेचे दिवाळे का वाजले? डॉलरच्या धुमधडाक्यात रुपयाचा रोज ‘आपटी बार’ का होतोय? महागाई कमी का होत नाही? गॅस व पेट्रोल-डिझेलचे दर दुपटीने का वाढले? असे सवाल सामानाच्या माध्यमातून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने केले आहेत.
या फटाक्यांची वात जेव्हा पेटेल तेव्हा सरकारच्या खुर्चीखाली धमाका झाल्याशिवाय राहणार नाही,” असा इशारा शिवसेनेने दिला आहे.
सत्तांतरातून राज्यात कोणाचे खिसे किती गरम झाले हे आता महाराष्ट्रातील जनतेपासून लपून राहिलेले नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची दिवाळी जोरात झाली असली तरी जनतेचे काय हा प्रश्न कायमच आहे. महागाई बेरोजगारी आर्थिक मंदीचे सावट बिघडलेले अर्थचक्र यामुळे सामान्य जनता आणि अतिवृष्टीमुळे अभूतपूर्व संकटात सापडलेला राज्यातील बळीराजा आज अंधारात चाचपडत आहे अर्थात राज्यातील मिंधे सरकार दिवाळी संपण्यापूर्वी जनतेला किमान दिलासा देईल अशी अपेक्षा करणे व्यर्थच असल्याचं म्हणत शिंदे सरकावर हल्ला चढवला आहे.
“कितीही संकटे येवोत, जीवन-मरणाचे प्रश्न उभे राहोत, पण मुळातच उत्सवप्रिय असलेला आपला समाज सणवार आले की, या अडीअडचणी व संकटांना तात्पुरते का होईना, बाजूला ठेवून सणाच्या आनंदात मोठय़ा उत्साहाने सहभागी होतो. यंदाचा दिवाळीचा सणही सालाबादप्रमाणे हर्षोल्हासात साजरा होत असला तरी या आनंदोत्सवालाही चिंतेची आणि काळजीची एक किनार आहेच. राज्यातील महानगरे व मोठय़ा शहरांत दिवाळीचा धुमधडाका जोरात दिसत असला तरी महाराष्ट्राच्या कानाकोपऱयातील ग्रामीण जनता मात्र ऐन दिवाळीत चिंताक्रांत होऊन बसलेली दिसत आहे,” असंही या संपादकीयमध्ये म्हंटल आहे.
“पगाराची निश्चित रक्कम मिळणारा चाकरमानी वर्ग, सरकारी व खासगी क्षेत्रात नोकरीला असणाऱया मंडळींना दिवाळीनिमित्ताने मिळणारा बोनस आणि निश्चित उत्पन्नामुळे कर्ज देण्यास तत्पर असलेल्या बँका यामुळे दिवाळीच्या काळात सर्वत्र खरेदीचा माहौल दिसत असला तरी पगार, बोनस मिळत नसलेल्या गरीब शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब, कष्टकरी व रोजंदारीवर काम करणाऱया मंडळींच्या नशिबी मात्र खरेदीची ही चंगळ नसते. त्यातूनही असेल तेवढय़ा उत्पन्नातून चार पैसे वाचवून मुलाबाळांसाठी फटाक्यांची खरेदी, थोडेफार गोडधोड करून दिवाळीचे स्वागत करण्याचा प्रयत्न जो तो करीत असतो. याचा अर्थ लोकांना दैनंदिन जीवनात जे प्रश्न भेडसावताहेत, त्यांचा जनतेला विसर पडला या भ्रमात सरकारने राहू नये,” असाही इशारा शिवसेनेनं शिंदे सरकारला दिला आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Eknath Shinde | “24 मिनिटात त्यांनी काय पाहणी केली?”, शिंदे गटाच्या ‘या’ नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक सवाल
- Electric Scooter | High रेंज सह बाजारात उपलब्ध आहे ‘या’ इलेक्ट्रिक स्कूटर
- Deepak Kesarkar | “दगडाला पाझर फुटत नव्हता म्हणूनच 50 आमदार…”; दीपक केसरकरांचा ठाकरेंना टोला
- Diwali 2022 | दिवाळी दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करा ‘या’ गोष्टी
- Pravin Darekar | “तुम्ही भाजपमध्ये राहून विरोधकांसाठी काम करता, असं फडणवीस नेहमी म्हणतात”