मुंबई : मशिदीवरील भोंग्यांसंदर्भात मनसेने आक्रमकपणे घेतलेली भूमिका व हनुमान चालीसा आंदोलन यामुळे राज्यातलं राजकीय वातावरण चांगलेच तापलेले आहे. या आंदोलनामुळे पोलिसांनी राज्यभरात अनेक मनसे कार्यकर्त्यांची धरपकड केली आहे. आता मात्र एक वेगळी खळबळ उडवून देणारी बातमी समोर येत आहे. एकीकडे हे सगळं गोंधळ सुरु असताना आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांना जीवे मारण्याची धमकी पत्राद्वारे दिली होती. आता ठाकरे सरकारने याबाबद मोठा निर्णय घेतला आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना आलेल्या धमकीच्या पत्राच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे व बाळा नांदगावकर यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज ठाकरे यांच्या सुरक्षेच्या ताफ्यात एक पोलिस अधिकारी आणि एक पोलिस अंमलदार वाढविण्यात आला आहे. काल राज ठाकरेंच्या सुरक्षेविषयी गृहमंत्री वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चा झाली होती आणि आज अखेर राज्य सरकारने राज ठाकरे यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी काल संध्याकाळी भेट घेतली. या भेटीत प्रामुख्याने राज ठाकरे यांना आलेल्या धमकीबाबत चर्चा झाली. याअगोदर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली होती. या भेटीत दीर्घ चर्चा झाली. यानंतर काल वळसे पाटलांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन राज ठाकरे यांच्या सुरक्षेविषयीची माहिती मुख्यमंत्र्यांना सांगितली होती.
महत्वाच्या बातम्या –