राज्याच्या तिजोरीत खडखडाट असताना अजितदादांच्या सोशल मीडियासाठी 6 कोटी राखीव ठेवण्याचा निर्णय

ajit pawar

मुंबई : राज्यात सध्या कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. राज्य आर्थिक संकटात असल्याचे सरकारकडून वारंवार सांगितले जात असून राज्याच्या तिजोरीत खडखडाट असल्याचे सांगितले जात आहे. एका बाजूला ही परिस्थिती असल्याचे भासवले जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या सोशल मीडियासाठी वर्षाला 6 कोटींचा निधी राखीव ठेवण्यात आला असल्याचे वृत्त समोर आले आहे.

या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यात कोरोना महामारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं आहे. त्यामुळे राज्याच्या तिजोरीवर आर्थिक भार पडला आहे.अशातच सामान्य प्रशासन विभागाने बुधवारी यासंदर्भातील आदेश जारी केल्याने चर्चांना उधाण आले आहे.

या आदेशात अजित पवार यांची सोशल मीडियावरील खाती सांभाळण्यासाठी आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एखादी बाहेरची कंपनी नियुक्त करण्यात येणार आहे. ही कंपनी अजित पवार यांचे ट्विटर, फेसबुक, ब्लॉगर, यूट्युब आणि इन्स्टाग्राम खात्याचे काम बघेल.

याशिवाय, व्हॉटसएप बुलेटिन, टेलिग्राम आणि एसएमएस पाठवण्याची जबाबदारीही या कंपनीवर असेल. अजित पवार यांचे सचिव आणि सामान्य माहिती व जनसंपर्क विभागाशी बोलणी झाल्यानंतर या नव्या कंपनीकडे सर्व कारभार दिला जाईल.

महत्त्वाच्या बातम्या

IMP