‘महाराष्ट्रातही ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा’, : किरीट सोमय्या

किरीट सोमय्या

मुंबई : मागील काही दिवसांपासून लव्ह जिहाद विरोधात देशातील वातवरण चांगलेच तापत असल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेश, हरियाणा पाठोपाठ आता कर्नाटकमध्येही लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचा विचार सुरू आहे.

लव्ह जिहाद किंवा रोमियो जिहाद हे मुस्लिम पुरुषांनी मुस्लिम नसलेल्या मुस्लिमांना इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी प्रेमाचं आमिष दाखवून धर्मांतर करण्यातला लावण्याचा प्रकार समजला जातो. प्रेमाचा ढोंगीपणा आहे. भारतामध्ये केरळमध्ये प्रथम आणि नंतर कर्नाटकमध्ये २००९ मध्ये या संकल्पनेने देशाचे लक्ष वेधून घेतले होते. हा शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो पण ब्रिटनसारख्या देशांमध्येही अशाच प्रकारच्या कृती झाल्या आहेत.

भाजपशासित राज्यात ‘लव्ह जिहाद’विरोधात कायदा आणण्याची तयारी सुरू आहे. तर उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ  सरकारने लव्ह जिहादविरोधात  कायदा आणण्याची संपूर्ण तयारी केली आहे. मध्य प्रदेशातील शिवराज सरकार देखील योगी सरकारच्या पावलावर पाऊल टाकण्याच्या विचारात आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात देखील ठाकरे सरकारने लव्ह जिहादविरोधी कायदा आणावा, अशी मागणी भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केली आहे.

दरम्यान , केरळ उच्च न्यायालयानं राज्यात लव्ह जिहादचं कोणतंही प्रकरण नसल्याचं  म्हटलं होतं. याबद्दल केंद्र सरकारला प्रश्न विचारण्यात आला होता. आता त्यावर गृह मंत्रालयानं लिखित स्वरुपात उत्तर दिलं होत. लव्ह जिहादबद्दल गृह मंत्रालयानं लोकसभेत लिखित स्वरुपात दाखल केलेल्या उत्तरात सध्याच्या कायद्यांचा उल्लेख आहे.

महत्वाच्या बातम्या