मुंबई: एकनाथ शिंदे यांचा बंड इतिहासात कायम आठवणीत ठेवला जाईल, कारण या बंडामुळे आज महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. शिंदे गटात शिवसेना नेत्यांनी शामिल होण्याचा निर्णय घेत मविआचा पाठींबा काढून घेतला. काल फेसबुक लाईव्ह येत उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देत आपले मुख्यमंत्री पद सोडले. ठाकरे सरकार कोसळल्यानंतर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत.
दरम्यान या सर्व घडामोडींवर भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी.व्ही यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. देवेंद्र फडणवीस यांना चंद्रकांत पाटील लाडू भरवितानाचा फोटो पोस्ट करत श्रीनिवास बी.व्ही यांनी म्हटले कि, “प्रत्येक लाडूची किंमत ५० ते १०० कोटी आहे. यात सक्तवसुली संचालनालय, प्राप्तिकर विभागाचा (IT) मेहनतानाचा समावेश नाही”
हर एक 'लड्डू' की कीमत 50 से 100 करोड़ है, जिसमे ED, IT का 'मेहनताना' शामिल नही..! pic.twitter.com/ZjBYARaJhh
— Srinivas BV (@srinivasiyc) June 29, 2022
दरम्यान काल या सर्व घडामोडीनंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणात जल्लोष करण्यात आला. तर भाजपच्या अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सरकार स्थापन होण्याचा दावाही केला आहे. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड केल्याने आणि १० अपक्ष आमदारांनी साथ सोडल्याने महाविकास आघाडी सरकार आधीच संकटात आले होते. सरकार बहुमत सिद्ध करू शकणार नाही, असे स्पष्ट दिसत असताना उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला. आता देवेंद्र फडणवीस यांना राज्यपाल नवे सरकार स्थापन करण्यासाठी पाचारण करतील. भक्कम संख्याबळासह फडणवीस पुन्हा सत्तेत येणे निश्चित आहे.
महत्वाच्या बातम्या:
- Bacchu Kadu : लॉजिक की मॅजिक? ठाकरे सरकार कोसळताच ‘त्या’ प्रकरणी बच्चू कडूंना ‘क्लीन चिट’
- Sanjay Raut : नेमकं हेच घडलं! “आपल्याच माणसांनी दिलेले पाठीवरचे घाव…”, संजय राऊतांचे ट्वीट चर्चेत
- Ram Satpute : “मनोरुग्ण संजय राऊतांच्या मार्गदर्शनात असणारं सरकार गेलं”, ‘भाजप’चा टोला
- Amol Mitkari : “महाराष्ट्र गुजरातला विकल्याचा आनंद पेढे भरून…”, अमोल मिटकरींचा भाजपवर निशाणा
- Raju Shetti : “ईडीच्या वादळात तुमचा अख्खा वाडा उद्धवस्त…”, राजू शेट्टींचा महाविकास आघाडीला टोला
>>> आमच्या सोशल मीडिया फेसबुक आणि टेलिग्राम ग्रुप मध्ये सामील व्हा! फेसबुक & टेलिग्राम ग्रुप <<<
>>> आपल्या परिसरातील महत्त्वाच्या समस्यांना वाचा फोडून, तुमच्या बातमीने बदल घडवा. { बातमी पाठवा SUBMIT NEWS } <<<