अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी ठाकरे सरकारने जाहीर केली ‘इतक्या’ कोटींची मदत

uddhav thakre

मुंबई : ठाकरे सरकारकडून एनडीआरएफच्या निकषांची वाट न पाहता अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांसाठी मदत जाहीर करण्यात आली आहे.

राज्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त बाधितांसाठी ठाकरे सरकारकडून मोठी मदत जाहीर करण्यात आली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी ही घोषणा केली असून त्यानुसार अतिवृष्टी आणि पूरग्रस्तांना १० हजार कोटींची मदत जाहीर करण्यात आली आहे.

दरम्यान, जून ते ऑक्टोबर २०२१ या काळात राज्यात पुरांमुळे तसेच अतिवृष्टीमुळे ५५ लाख हेक्टरहून अधिक शेतीपिकांचे नुकसान झाले. त्यामुळे ही मदत जाहीर करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्टर, बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्टर, तसेच ही मदत २ हेक्टर मर्यादेत करण्यात येणार आहे.

महत्वाच्या बातम्या