Share

Thackeray vs FadnAvis | तपास यंत्रणाच्या कारवायांवरुन ठाकरे-फडणवीस सामना रंगला! वार-पलटवार वाचा

Thackeray vs Fadnavis | मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis) असा सामना रंगला आहे. तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. शिवसेना खासदार संजय राऊत (Shiv Sena MP Sanjay Raut) जेलमधून बाहेर आल्यानंतर मोतोश्रीवर गेले, याठीकाणी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांनी तपास यंत्रणांवर ताशेरे ओढले. यावर देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार केला आहे.

केंद्रीय तपास यंत्रणा केंद्र सरकारच्या पाळीव प्राण्यांप्रमाणे वागत आहेत. ज्याच्या अंगावर जा म्हटलं त्याच्या अंगावर जात आहेत. बेकायदेशीरपणे जात आहेत. हे संपूर्ण जग बघत आहे. गेल्या काही दिवसातील उदाहरणे आपल्यासोबत आहेत. सर्व सामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालय असते आणि जर आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल. तर देशातील जनतेने त्याचा विरोध केला पाहीजे, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

यावर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) म्हणाले, उद्धव ठाकरे यांना आरोप करण्याची सवय आहे. कधीतरी त्यांनी आपल्या अंतर्मनात शिरुन बघितलं पाहिजे. म्हणजे याचे उत्तर त्यांना मिळेल.

काय म्हणाले होते उद्धव ठाकरे-

तपास यंत्रणांच्या विरोधात आपचे लोकही लढत आहेत. तेलंगणाच्या लोकांनी व्हिडीओच्या माध्यमातून प्रकरणच बाहेर आणलं आहे. सोरेन आणि ममता दीदींना छळलं जात आहे. हे सर्व एकत्र झाले तर किती मोठी ताकद उभी राहील, याची ताकद त्यांना माहीत नाही, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला सुनावलं आहे.

“सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही न्यायदेवता आपल्या ताब्यात घेतात की काय अशी वक्तव्य केंद्रीय मंत्री किरण रिजीजू यांची आहेत. त्यांनी न्यायदेवतेवर शंका उपस्थित केली आहे. एकूणच सर्व सामान्यांच्या आशेचा किरण हे न्यायालये असतात आणि न्यायलय जर आपल्या बुडाखाली घेण्याचा प्रयत्न केंद्र सरकार करत असेल, तर देशातल्या तमाम जनतेने त्याचा विरोध पाहिजे”, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोठा दावा केला आहे. “न्यायालयाने केंद्र सरकारला काल दणका दिलेला असतानाही कदाचित खोट्या केसमध्ये संजय राऊतांना गोवण्याचा प्रयत्न होऊ शकतो. कारण चपराक दिल्यानंतरही लाज वाटण्याइतकं सरकार संवेदनशील असतं तर अशा घटना घडल्या नसत्या.”

महत्वाच्या बातम्या : 

Thackeray vs Fadnavis | मुंबई : केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवायांवरुन उद्धव ठाकरे विरुद्ध देवेंद्र फडणवीस (Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis) असा …

पुढे वाचा

Maharashtra Marathi News Mumbai Politics

Join WhatsApp

Join Now