मुंबई : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून २०१९-२० मध्ये घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात हे निष्पन्न झाले असून आरोग्य विभागाच्या परीक्षेतील पेपरफुटीचा तपास करीत असताना म्हाडा व टीईटीच्या परीक्षेमधील गैरव्यवहार समोर आले आहे. त्यामुळे सर्व स्तराहून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यमंत्री बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली असून वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं, असे ते म्हणाले आहेत.
यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बच्चू कडू म्हणाले की,‘कुणावरच विश्वास राहिलेला नाही, इतकी वाईट अवस्था आहे. वाढत्या परीक्षा घोटाळ्यांमुळे संपूर्ण देशात मिलिट्री राज लावायला हवं. तसेच या घोटाळ्याला पूर्णपणे व्यवस्था जबाबदार आहे. त्यामुळे मिलिट्री आणल्यानंतरच सगळे व्यवस्थित होईल,’ असेही बच्चू कडू म्हणाले आहेत.
दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘परीक्षांमधील हा घोळ हे व्यवस्थेचे मोठे अपयश असून हे मोठे रॅकेट मोडून काढण्यासाठी या सगळ्यांवर कारवाई करण्यासाठी जनआंदोलन करण्याची गरज आहे’, असेही बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
शुद्धीवर नसलेल्या सरकारचा हा एक भरकटलेला निर्णय- प्रविण दरेकर
“गांजाप्रकरणातील अनुभवानुसार वाईनविक्रीच्या घोषणेची जबाबदारी नवाब मलिकांना दिली असावी”
“विरोधात असताना दारूला विरोध आणि सत्तेत असताना प्रोत्साहन देण्याची भाजपची रणनीती आहे का?”
दोन वर्षांच्या कालखंडानंतर पुन्हा रणंजी करंडक स्पर्धेचे नियोजन
“दोन नंबरच्या मार्गाने सत्तेत आलेल्यांना चांगले मार्ग कसे सुचतील?”, राम सातपुतेंचा हल्लाबोल