कसोटीचे महाभारत! सामना तेरावा, पंतच्या नाबाद खेळीने कांगारुचे गर्वहरण

wtc13

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा तेरावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १५ ते १९ जानेवारी दरम्यान ब्रिस्बेन येथे झाला होता.

जागतीक कसोटी चॅम्पियनशीप स्पर्धेतील भारतीय संघाचा हा सामना सर्वात रोमहर्षक आणि अविस्मरणीय ठरला. सलग तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३६९ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडुन लांबुशेनने सर्वाधीक १०८ धावांची शतकी खेळी साकारली. कर्णधार टीम पेनने ५० धावांची खेळी करत त्याला पुरेपुर साथ दिली. भारताकडुन नटराजन-सुंदर-ठाकुर या त्रिकुटाने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

दुसऱ्या डावात भारतीय फलंदाजानी चांगली सुरुवात केली मात्र मोठी खेळी करण्यात अपयश आले आणि भारताची अवस्था ६ बाद १८६ अशी झाली. ऑस्ट्रेलिया मोठी आघाडी मिळवण्याच्या तयारीत होते. मात्र त्यावेळी खेळपट्टीवर उभ्या असलेल्या शार्दुल ठाकुर(६७) आणि वॉश्गिंटन सुंदर(६२) यांच्या मनात भलतेच होते. या दोघांनी निर्णायक क्षणी १२६ धावांची भागीदारी करत सामन्याला कलाटनी दिली. या भागीदारीला ‘ठाकुरची सुंदर खेळी’ असे कौतुक केले. दोघांनी वैयक्तिक अर्धशतके साजरी केली. भारताने या डावात ३३६ धावांची मजल मारली. ऑस्ट्रेलियाकडुन जोश हेजलवुडने सर्वाधीक ५ गडी बाद केले.

पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला माफक ३३ धावांची आघाडी मिळाली. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाने आक्रमक खेळी करत २९४ धावांची मजल मारली. स्टिव्ह स्मिथने सर्वाधिक ५५ धावांची अर्धशतकी खेळी केली. भारताकडुन मोहम्मद सिराजने सर्वाधीक ५ गडी बाद केले. शार्दुल ठाकुरने त्याला पुरेपुर साथ देत ४ गडी बाद केले. भारतासमोर चौथ्या डावात ३२८ धावांचे लक्ष्य होते. यजमान ऑस्ट्रेलिया संघ ३२ वर्षापासुन या मैदानावर अंजिक्य असलेला विक्रम अबाधीत राहणार अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातुन उमटली होती. मात्र

भारतीय संघाचा कर्णधार अंजिक्य रहाणेच्या मनात काहीतरी वेगळच शिजत होते. सलामीवीर रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतल्यानंतर नवोदीत शुभमन गीलने आश्वासक ९१ धावांची खेळी केली. ही या सामन्यातील भारताकडुन सर्वाधीक खेळी होती. त्याला पुजाराने ५६ धावांची अर्धशतकी खेळी करत चांगली साथ दिली. या सामन्यात रिषभ पंतने नव्याने जन्म घेतला. सुरुवातीला स्वत:च्या अक्रमक खेळीला मुरड घालत त्याने सावध खेळी साकारली. मात्र एकदा जम बसल्यावर त्याने नैसर्गीक खेळाला सुरुवात केली. यादरम्यान धावा आणि चेंडुचे गणित क्रिकेट रसिकांच्या ह्रदयाचे ठोके वाढवत होते. नाबाद खेळीसाठी रिषभ पंतला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

विजयासाठी १० धावांची गरज असताना भारताने २ गडी गमावले. पुन्हा एकदा पराभवाची भिती मनाला चाटुन गेली. विजयासाठी ३ धावा हव्या असताना पंतने ऑफ ड्राईव्ह मारला आणि भारताने ऑस्ट्रेलियाच्या अंहकाराला चिरडुन टाकत विजय साजरा केला. डब्ल्युटीसी स्पर्धेतील हा सर्वात अविस्मरणीय विजय होता.

महत्वाच्या बातम्या

IMP