कसोटीचे महाभारत! सामना दहावा, कांगारुचा भारतावर ८ गडी राखुन विजय

wtc10

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा दहावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध १७ ते २१ डिसेंबर दरम्यान अॅडलेड येथे झाला होता.

या सामन्यान नाणेफेक जिंकुन भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात २४४ धावांची मजल मारली. कर्णधार विराट कोहलीने भारताकडुन सर्वाधीक ७४ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. त्याला चेतेश्वर पुजारा(४३) आणि अंजिक्य रहाणे(४२) यांनी पुरेशी साथ दिली. याच्यांव्यतिरीक्त इतर फलंदाज सपशेल अपयशी ठरले. ऑस्ट्रेलियाकडुन मिचेल स्टार्कने सर्वाधिक ४ गडी बाद केले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलिया संघाला दुसऱ्य डावात १९१ धावांपर्यंत मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार टीम पेनने सर्वाधीक ७३ धावांची अर्धशतकी खेळी केली. त्याला लांबुसचंगेने ४७ धावांची खेळी करत साथ दिली. भारताकडुन या डावात आर अश्विनने सर्वाधीक ४ गडी बाद केले.

ऑस्ट्रेलियाला १९१ धावांवर गुडांळल्यामुळे भारताकडे ५३ धावांची निर्णायक आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चांगली कामगीरी करत ऑस्ट्रेलिया संघासमोर मोठे लक्ष्य ठेवेल अशी क्रिकेटरसिकांना होती. मात्र भरताच्या दुसऱ्या डावात जे घडले ते खुपच धक्कादायक होतं. भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात वेदनादायी प्रसंग तो होता. या सामन्यातील भारताचा संपुर्ण संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. ३६ धावांवर भारताने ९ गडी गमावले होते. तर जखमी झाल्यामुळे मोहम्मद शमी रिटायर्ड हर्ट होउन माघारी परतला होता.

या डावात एकाही भारतीय फलंदाजाला दुहेरी धावसंख्या ओलांडता आली नाही. या डावात ऑस्ट्रेलियाचा जेशल हेजलवुडने सर्वाधीक ५ गडी बाद केले. पहिल्या डावातील ५३ धावांच्या आघाडीसह ऑस्ट्रेलियापुढे ९० धावांचे माफक लक्ष्य होते. हे लक्ष्य ऑस्ट्रेलिायाने २ गडी गमावत भारतावर ८ गडी राखुन पराभव केला.

कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भावानंतर जवळपास ८-१० महिन्यानंतर भारतीय संघ आंतरराष्ट्रीय सामना खेळत होता. या सामन्यातील विजयासह ऑस्ट्रेलियाने गुलाबी चेडुंच्या सामन्यातील विजयाची घौडदौड कायम राखली. भारताच्या पहिल्या डावात अजिंक्य रहाणेच्या चुकीच्या कॉलवर विराट कोहली बाद झाला हाच सामन्याला कलाटणी देणारा क्षण ठरला. तर ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात २६ धावांवर दिलेले जिवदान भारताला महागात पडले. या सामन्यानंतर विराट कोहली मायदेशी परतला तर मोहम्मद शमी दुखापतीमुळे मालिकेतुन बाहेर पडला.

महत्वाच्या बातम्या

IMP