कसोटीचे महाभारत! सामना अकरावा, रहाणेच्या शतकामुळे ‘बॉक्सिंग डे’ कसोटीत भारताचा ८ गडी राखुन विजय

wtc 11

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा आकरावा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध २६ ते ३० डिसेंबर दरम्यान मेलबर्न येथे झाला होता.

पहिल्या कसोटी सामन्यातील ३६ वर संपुर्ण संघ बाद झाल्यानंतर भारतीय संघाला सर्वस्तरातुन टिका सहन करावी लागत होती. टिकेचा काटेरी मुकुट कर्णधार कोहलीने अंजिक्य रहाणेच्या मस्तकावर चढवुन पितृत्व रजा घेउन मायदेशी परतला होता. २६ डिसेंबर रोजी आयोजीत कसोटीला बॉक्सिंग डे कसोटी म्हणले जाते. या सामन्यात भारताने नाणेफेक गमावली. यजमान ऑस्ट्रेलिया संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय गोलंदाजानी सुरेख मारा करत ऑस्ट्रेलिया संघाला १९५ धावांवर रोखले. ऑस्ट्रेलियाकडुन लांबुशेनने सर्वाधिक ४८ धावा केल्या होत्या. तर भारताकडुन जसप्रीत बुमराहने सर्वाधीक ४ गडी बाद केले होते. अश्विनने त्याला पुरेपुर साथ देत ३ बळी टिपले होते.

दुसऱ्या डावात फलंदाजीला येत भारतीय संघाने ३२६ धावांची मजल मारली. या डावात कर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधिक ११२ धावांची शतकी खेळी साकारली. त्याला अष्टपैलु खेळाडु रवींद्र जडेजाने (५७) पुरेशी साथ दिली होती. ऑस्ट्रेलियाकडुन मिचेल स्टार्क आणि नॅथम लायनने प्रत्येकी ३-३ गडी बाद केले होते. पहिल्या डावात भारताला निर्णायक १३१ धावांची निर्णायक आघाडी मिळाली होती.

ऑस्ट्रेलियाचे फलंदाज पुन्हा एकदा भारतीय गोलंदाजीच्या जाळ्यात अडकले आणि दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाचा संपुर्ण संघ केवळ २०० धावांची मजल मारु शकला. या डावात ऑस्ट्रेलियाकडून कॅमेरुन ग्रिनने सर्वाधिक ४५ धावांची खेळी साकारली होती. तर सलामीवीर मॅथ्यु वेडने (४०) त्याला पुरेपुर साथ दिली होती. भारताकडुन नवोदीत मोहम्मद सिराजने सर्वाधीक ३ गडी बाद केले होते. त्याला बुमराह-जडेजा-अश्विन या त्रिकुटाने प्रत्येकी २-२ गडी बाद करत साथ दिली. चौथ्या डावात भारताला ७० धावांचे माफक अव्हान भारतीय संघाने २ गडी गमावुन पार केले.

पहिल्या सामन्यातील सुमार कामगीरीनंतर दुसऱ्या सामन्यात भारताला मिळालेला हा विजय खुप आत्मविश्वास देउन गेला. आणि भारताने कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. पहिल्या डावातील शतकासाठी अंजिक्य रहाणेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. या सामन्यात भारताने पृथ्वी शॉला संघाबाहेर करुन शुभमन गीलला संधी दिली होती. तर फंलादाजीतील अपयशामुळे वृद्धीमान साहाच्या जागी रिषभ पंतला संधी दिली. न्युझीलंडमध्ये सुरु झालेली पराभवाची मालिका बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील विजयाने संपुष्टात आली. कर्णधार म्हणून रहाणेचा हा तिसरा सामना होता. आणि हे तिनही सामने भारताने जिकंलेले आहेत.

महत्वाच्या बातम्या

IMP