कसोटीचे महाभारत! पहिल्या सामन्यात ‘रहाणे’च्या खेळीमुळे वेस्ट इंडिजवर भारताचा ३१८ धावांनी विजय

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. २०१९ मध्ये २२ ऑगस्ट रोजी पहिला सामना भारताचा वेस्ट इंडिज विरुद्ध अँटिगा येथे झाला होता.

या सामन्याआधी डब्ल्युटीसी स्पर्धेच्या गुणतालीकेत भारत आठव्या तर वेस्ट इंडिज हा पहिल्या स्थानावर होता. जानेवारी महिन्यात वेस्ट इंडिजने इंग्लंडचा २-० असा दारुण पराभव केला होता. यात एकदा इंग्लंडचा संपुर्ण संघ ७७ धावावर बाद केला होता. याचा परिणाम म्हणून विंडीजने ४ वेगवान गोलंदाज खेळवण्यचा निर्णय घेतला. या डावात भारतीय संघाने २९७ धावांची मजल मारली. या डावात भारतीय संघाकडुण उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधीक ८१ धावांची खेळी केली. त्याच्या खालोखाल सलामीवीर के एल राहुल(४४) आणि रविंद्र जडेजा(५८) यांनी भारतीय संघाचा डाव सावरला. प्रत्युत्तरात भारतीय गोलंदाजानी वेस्ट इंडिज संघाला २२२ धावात रोखले. यात भारताकडुन इशांत शर्माने सर्वाधीक ५ गडी बाद केले.

यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या डावात सावध फलंदाजी करताना ७ गडी गमावत ३४३ धावावर डाव घोषीत केला. या डावतही उपकर्णधार अजिंक्य रहाणेने सर्वधिक १०१ धावांची शतकी खेळी केली. त्याच्या पाठोपाठ विराट कोहली (५१) आणि हनुमा विहारी(९३) यांनी भारताच्या धावसंख्येत भर घातली. पहिल्या डावातील ७५ धावांच्या आघाडीसह भारताने वेस्ट इंडिजसमोर ४१९ धावांचे लक्ष्य ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या वेस्ट इंडिज संघाचा भारतीय वेगवान माऱ्यासमोर टिकाव लागला नाही. अवघ्या १०० धावात वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ बाद करत भारतीय संघाने ३१८ धावांनी दणदणीत विजय मिळवला. दुसऱ्या डावात जसप्रीत बुमराहने ८ षटके गोलंदाजी करताना ७ धावा देत ५ गडी बाद केले. दोन्ही डावातील झुंझार खेळीसाठी अंजिक्य राहाणेला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आहे.

महत्वाच्या बातम्या

IMP