कसोटीचे महाभारत! तिसरा सामना, रोहित शर्माच्या ‘हिट’ खेळीमुळे भारताचा दक्षिण अफ्रिकेवर २०३ धावांनी दणदणीत विजय

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा तिसरा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध २ ते ६ ऑक्टोबर दरम्यान विशाखापट्टनम येथे झाला होता.

वेस्ट इंडिजला त्यांच्या भूमित २-० असे नमवल्यामुळे आत्मविश्वास द्विगुणीत झाल्यानंतर भारतीय संघाची दुसरी मालिका मायदेशात दक्षिण अफ्रिकेविरुद्ध होती. पहिल्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फंलदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारताने ७ गडी गमावत ५०२ धावांचा डोंगर उभा केला. या डावात भारताकडुन सलामीवीर मंयक अग्रवालने सर्वाधिक २१५ धावांची द्विशतकी खेळी साकारली होती. रोहित शर्माने सलामीवीर म्हणून १७५ धावांची पहिली शतकी खेळी करत मंयकला पुरेपुर साथ दिली. या सामन्यात दोघांनी ३१७ धावांची सलामी दिली होती. या डावात दक्षिण अफ्रिकेकडुन केशव महाराजने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

दुसऱ्या डावात भारताच्या धावाचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा संघाने जोरदार लढत गेत ४३१ धावांची मजल मारली. दक्षिण अफ्रिकेकडून सलामीवीर डीन एल्गार ने सर्वाधीक १६० धावांची खेळी केली. यष्टीरक्षक क्विटंन डिकॉकने त्याला पुरेपुर साथ देत १११ धावांची साथ दिली. एकवेळ १७८ वर ५ गडी बाद असताना डिकॉक आणि एल्गारने १६४ धावांची भागिदारी करत दक्षिण अफ्रिकेचा डाव सावरला. या डावात भारताकडुन आर अश्विनने सर्वाधिक ७ गडी बाद केले.

पहिल्या डावातील ७१ धावाच्या आघाडीसह भारतीय संघाने आक्रमक खेळी करत ४ गडी गमावत ३२३ धावांवर डाव घोषीत केला. या डावात भारताकडुन रोहित शर्माने पहिल्या डावातील तडाखा चालु ठेवत पुन्हा १२७ धावांची शतकी खेळी साकारली. सलामीवीर म्हणून पहिल्याच सामन्यात दोन्ही डावात शतक झळकावण्याचा विक्रम रोहितने केला. त्याला चेतेश्वर पुजाराने ८१ धावांची अर्धशतकी खेळी करत पुरेपुर साथ दिली.

चौथ्या डावात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर विजयासाठी १११ षटकांत ३९५ धावांचे लक्ष्य ठेवले. मोहम्मद शमी आणि रविंद्र जडेजाच्या गोलंदाजीसमोर दक्षिण अफ्रिकेचा संघ १९१ धावात आटोपला. दक्षिण अफ्रिकेकडुन डेन पायडेटने सर्वाधीक ५६ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर भारताकडुन मोहम्मद शमीने सर्वाधिक ५ गडी बाद केले. रविंद्र जडेजाने ४ गडी बाद करत त्याला पुरेपुर साथ दिली. या सामन्यात रोहितने सर्वाधिक (१३) षटकार आणि भारतीय संघाने (२७) षटकार मारण्याचा विक्रम केला. आतापर्यंत एकदाही यष्टीचीत न होणारा रोहित या सामन्यात दोन्ही डावात यष्टीचित झाला. तर आर आश्विनने या सामन्यात ३५० बळींचा टप्पा ओलांडला. दोन्ही डावातील शतकी खेळीमुळे रोहित शर्माला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

IMP