कसोटीचे महाभारत! नवव्या सामना, न्युझीलंड पुन्हा भारताला नडला, ७ गडी राखुन केला पराभव

wtc9

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा नववा सामना न्युझीलंडविरुद्ध २९ फेब्रुवारी ते २ मार्च दरम्यान क्राईस्टचर्च येथे झाला होता.

सलग दुसऱ्या सामन्यात न्युझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकली आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मागील पराभवातुन धडा घेत भारतीय संघ या सामन्यात पुनरागमन करेल अशी अपेक्षा होती. सलामीवीर पृथ्वी शॉने सुरुवातीपासुनच आक्रमक फलंदाजी करत चांगली सुरुवात केली. मात्र ५४ धावांवर बाद होताच पुन्हा भारतीय फलंदाजी ढेपाळली. शॉ व्यतिरिक्त चेतेश्वर पुजारा(५४), हनुमा विहारी(५५) या दोघाव्यतिरिक्त इतर फलंदाज आपयशी झाले आणि संपुर्ण भारतीय संघ २४२ धावांवर माघारी तंबुत परतला. न्युझीलंडकडुन कायली जेमीनसनने सर्वाधिक ५ गडी बाद केले.

दुसऱ्या डावात फलंदाजी करताना न्युझीलंडच्या संघाला भारतीय गोलंदाजानी २३५ धावांत रोखले. आणि ७ धावांची निसटती आघाडी प्राप्त केली. या डावात न्युझीलंडकडुन सलामीवीर टॉम लँथमने सर्वाधीक ५२ धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तर गोलंदाजीत ५ गडी बाद करणाऱ्या जेमीनसनने ४९ धावांची खेळी केली. मोहम्मद शमीने भारताकडुन सर्वाधिक ४ गडी बाद केले. या डावात पुन्हा न्युझीलंडच्या तळाच्या फलंदाजानी भारतीय संघाला सतावले. ८ बाद १७७ वरुन न्युझीलंडचा डाव २३५ धावांपर्यंत तळाच्या फलंदाजामुळे पोहोचला.

गोलंदाजाच्या कामगीरीचा फायदा उचलुन भारतीय संघ दुसऱ्या डावात चांगली आघाडी घेईल अशी अपेक्षा भारतीय क्रिकेट रसिकांना होती. मात्र ही अपेक्षा भारताने सपशेल खोटी ठरवली. दुसऱ्या डावात संपुर्ण भारतीय संघ केवळ १२४ धावा जोडु शकला. भारताकडुन चेतेश्वर पुजाराने सर्वाधिक २४ धावांची खेळी साकारली. या डावात भारताचे केवळ चार फलंदाज दुहेरी अकडा गाठु शकले. न्युझीलंडकडुन या डावात ट्रेंट बोल्टने सर्वाधीक ४ गडी बाद केले.

चौथ्या डावात न्युझीलंडसमोर १३२ धावांचे माफक अव्हान भारताने ठेवले होते. भारताकडुन संघर्षाची अपेक्षा असताना न्युझीलंडचे सलामीवीर टॉम लँथम आणि टॉम ब्लंडेल यांनी शतकी सलामी देत भारताचा पराभव निश्चीत केला. ३ गडी गमावत न्युझीलंडने सलग दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा तडाखा दिला. सलामीवीर टॉम ब्लंडेलने न्युझीलंडकडुन सर्वाधीक ५५ धावांची खेळी केली. अष्टपैलु खेळी साठी कायली जेमिनसनला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

या मालिकेपुर्वी न्युझीलंडच्या संघाने श्रीलंकेविरुद्धची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली होती. तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध ०-३ असा पराभव स्विकारला होता. त्यामुळे भारताविरुद्ध मिळवलेला हा विजय त्याच्या आत्मविश्वास वाढविनारा ठरला

महत्वाच्या बातम्या

IMP