कसोटीचे महाभारत! चौथा सामना, कोहलीच्या नाबाद द्विशतकामुळे अफ्रिकेवर मिळवला होता मोठा विजय

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा चौथा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध १० ते १४ ऑक्टोबर दरम्यान पुणे येथे झाला होता.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिकुंन प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताने ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषीत केला. भारताकडुन कर्णधार विराट कोहलीने सर्वधिक नाबाद २५४ धावांची द्विशतकी खेळी केली. विराटला यात सलामीवीर मंयक अग्रवाल (१०८), चेतेश्वर पुजारा(५८), अंजिक्य रहाणे(५९) आणि रविंद्र जडेजा(९१) यांची पुरेपुर साथ लाभली. या डावात दक्षिण अफ्रिकेकडुन कासीगो रबाडाने सर्वाधीक ३ गडी बाद केले.

भारताने उभारलेल्या ६०१ धावांच्या पाठलाग करण्यासाठी फलंदाजीसाठी उतरलेल्या दक्षिण अफ्रिकेचा पहिला डाव २७५ वर अटोपला. ५३ वर ५ गडी बाद झाल्यानंतर कर्णधार फाफ डु प्लेसिस आणि क्विटंन डिकॉक यांनी दक्षिण अफ्रिकेचा डाव सावरला. या डावात गोलंदाज केशव महाराजने सर्वाधिक ७२ धावांची खेळी केली. त्या खालोखाल डुप्लेसिसने ६४ धावांची अर्धशतकी खेळी केली. अश्विनने या डावात भारताकडुन सर्वाधीक ४ गडी बाद केले.

पहिल्या डावात ३२६ धावांची बलाढ्य आघाडी घेत भारताने दक्षिण अफ्रिकेच्या संघाला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाज भारतीय गोलंदाजीसमोर पुन्हा अपयशी ठरले आणि दक्षिण अफ्रिकेचा संपुर्ण संघ १८९ धावांवर अटोपला. आणि भारताने हा सामना एक डाव आणि १३७ धावांनी जिकंला सलामीवीर डीन एल्गारने दक्षिण अफ्रिकेकडुन सर्वाधीक ४८ धावांची खेळी केली. कर्णधार फाफ डु प्लेसीसने ५४ चेडुंत अवघ्या ५ धावांची संथ खेळी केली. तर भारताकडुन उमेश यादव आणि जडेजा यांनी प्रत्येकी ३-३ गडी बाद केले.

या सामन्यात कोहलीने नवव्यांदा १५० पेक्षा जास्त धावा काढत सर डॉन ब्रॅडमन यांना मागे टाकले. तर या सामन्यात भारताचे केवळ ५ फलंदाज बाद झाले होते. तर भारतीय गोलंदाजानी प्रतिस्पर्धी संघ दक्षिण अफ्रिकेच्या संघाला दोन वेळेस बाद केले. पहिल्या डावातील नाबाद द्विशतकामुळे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

IMP