कसोटीचे महाभारत! पाचवा सामना, हिटमॅनच्या द्विशतकामुळे भारताने दक्षिण अफ्रिकेला एका डावाने नमवले

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. भारताचा चौथा सामना दक्षिण अफ्रिकेविरुद्ध 19 ते 23 ऑक्टोबर दरम्यान रांची येथे झाला होता.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकुन पुन्हा एकदा प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेसमोर 9 गडी गमावत 497 धावांचा डोगंर उभा केला. या डावात भारताकडुन सलामीवीर रोहित शर्माने सर्वाधिक 212 धावांची द्विशतकी खेळी साकारली. उपकर्णधार अजिंक्य रहाणे(115) आणि रविंद्र जडेजाने (51) चांगली साथ दिली. या डावात दक्षिण अफ्रिकेकडुन पदार्पण करणाऱ्या जॉर्ज लिंडेने सर्वाधिक 4 गडी बाद केले.

भारताने उभारलेल्या 497 धावांचा पाठलाग करताना दक्षिण अफ्रिकेचा पहिलाच बळी दुसऱ्याच चेडुंवर गेला. या डावात दक्षिण अफ्रिकेचा संपुर्ण संघ 162 धावांवर माघारी तंबुत परतला. दक्षिण अफ्रिकेकडुन जुबेर हमजाने सर्वाधिक 62 धावांची अर्धशतकी खेळी साकारली. तर भारतीय संघाकडुन उमेश यादवने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

पहिल्या डावातील 335 धावांच्या आघाडीच्या जोरावर विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात दक्षिण अफ्रिकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या डावात भारतीय गोलंदाजीसमोर दक्षिण अफ्रिकेच्या फलंदाजाची दाणादाण उडाली. अवघ्या 36 धावावर दक्षिण अफ्रिकेचा अर्धा संघ माघारी तंबुत परतला. मात्र तळाच्य फलंदाजानी थोडीशी झुंज दिल्याने दक्षिण अफ्रिकेचा संघ 100 धावांचा टप्पा ओलांडु शकला. मात्र दक्षिण अफ्रिकेचा संपुर्ण संघ 133 धावांवर बाद झाला. आणि भारताने हा सामना एक डाव आणि 202 धावांनी जिंकला. या डावात दक्षिण अफ्रिकेक़डुन थियनिस डी ब्रूयनने सर्वाधिक 30 धावांची खेळी केली. तर भारताकडुन मोहम्मद शमीने सर्वाधिक 3 गडी बाद केले.

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचा हा सर्वात मोठा विजय ठरला. या सामन्यात सलामीवीर रोहित शर्माने शतक आणि द्विशतक दोन्ही षटकार मारुन पुर्ण केले. तर गोलंदाज उमेश यादवने 10 चेंडुत 5 षटकारासंह केलेल्या 31 धावा या कमीत कमी चेंडुत 30 पेक्षा धावा करणारा पहिल्या क्रमांकाचा फलंदाज बनला. द्विशतकासाठी सलामीवीर रोहित शर्माला सामनावीराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

IMP