कसोटीचे महाभारत! ‘हनुमा विहारी’चे शतक आणि बुमराहच्या हॅटट्रिकमुळे वेस्ट इंडिजवर भारताचा २५७ धावांनी विजय

मुंबई : येत्या १८ ते २२ जुन दरम्यान भारत आणि न्युझीलंड संघादरम्यान जागतीक कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. या सामन्यापर्यंत भारतीय संघाचा प्रवास कसा झाला त्याचा हा आढावा. २०१९ मध्ये ३० ऑगस्ट ते ३ सप्टेंबर दरम्यान भारताचा दुसरा सामना वेस्ट इंडिज विरुद्ध अँटिगा येथे झाला होता.

या सामन्यात वेस्ट इंडिजने नाणेफेक जिंकुन फलंदाजीसाठी भारतीय संघाला पाचारण केले. पहिल्या सामन्यातील कामगीरी भारतीय फलंदजानी इथेही सुरु ठेवली. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने वेस्ट इंडिजसमोर ४१६ धावांचा डोगर उभा केला. भारताकडून हनुमा विहारीने सर्वाधीक १११ धावांची शतकी खेळी साकारली. त्याच्या खालोखाल कर्णधार विराट कोहली(७६), मयंक अग्रवाल (५५) आणि ईशांत शर्मा (५७) यांनी साथ दिली. वेस्ट इंडिजकडुन कर्णधार जेसन होल्डरने सर्वाधिक ५ गडी बाद केले. यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या वेस्ट इंडिजच्या खेळाडुंचा भारतीय गोलंदाजासमोर टिकाव लागला नाही. अवघ्या ११७ धावात वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ बाद झाला. या डावात वेस्ट इंडिजकडुन हेटमायरने सर्वाधिक ३४ धावा केल्या. तर भारताकडुन जसप्रीत बुमराहने हॅटट्रिकसह सर्वाधिक ६ गडी बाद केले. या डावात बुमराहने हॅटट्रिक देखील घेतली होती.

पहिल्या डावात २९९ धावांची आघाडी असतानाही बुमराहच्या दुखापतीमुळे भारतीय संघाने दुसऱ्या डावात फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ४ गडी गमावत १६८ धावावंर भारताने आपला दुसरा डाव घोषीत केला. या डावात उपकर्णधार अंजिक्य रहाणेने सर्वाधिक ६४ धावांची नाबाद अर्धशतकी खेळी साकारली. त्याच्या पाठोपाठ पहिल्या डावातील शतकवीर हनुमा विहारीने नाबाद ५३ धावा केल्या. पहिल्या डावातील २९९ धावांच्या आघाडीसह भारताने विंडीजसमोर विजयासाठी ४६८ धावांचे कठीण लक्ष्य ठेवलं. या डावात वेस्ट इंडिजच्या फलंदाजाचा पुन्हा भारतीय गोलंदाजासमोर टिकाव लागला नाही आणि २१० धावसंख्येवर वेस्ट इंडिजचा संपुर्ण संघ माघारी तंबुत परतला. आणि भारताने हा सामना २५७ धावांनी जिंकला. वेस्ट इंडिज कडुन शामराह ब्रुक्सने सर्वाधिक ५० धावांची खेळी केली. तर पहिल्या डावातील शतक आणि दुसऱ्या डावातील अर्धशतकासाठी हनुमा विहारीला सामनाविराच्या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.

महत्वाच्या बातम्या

IMP