जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला , तीन भारतीय जवान शहीद

दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर केलेल्या गोळीबारात तीन जवान शहीद झाले आहेत. श्रीनगर – जम्मू राष्ट्रीय महामार्गावर पंम्पोर येथे दहशतवाद्यांनी लष्कराच्या ताफ्यावर गोळीबार केला. गोळीबारानंतर संपुर्ण परिसरात नाकेबंदी करण्यात आली असून दहशतवाद्यांचा शोध घेतला जात आहे.
जम्मू काश्मीरमधील पंपोर येथे दहशतवाद्यांनी भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या वाहनवार हल्ला केला. या वाहनावर केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले. हल्ला केल्यानंतर दहशतवाद्यांनी तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. 
भारतीय जवानांनी या हल्ल्याला चोख प्रत्युत्तर दिल्याचे केंद्रीय राखीव दलाच्या महासंचालकांनी सांगितले. जिथे हा हल्ला झाला तो रहिवासी परिसर असल्यामुळे गोळीबार करण्यास अडचणी आल्या. त्यामुळे याचा फायदा घेऊन दहशतवाद्यांनी तेथून पळ काढल्याचे त्यांनी सांगितले.