पुण्यातील जवान काश्मीरमध्ये शहीद

पुणे : पाम्पोर येथील दहशतवाद्यांच्या हल्यात पुण्यातील सौरभ नंदकिशोर फराटे (वय ३२) हे जवान शहीद झाले आहे. उद्या दुपारी चार वाजता त्यांचे पार्थिव पुण्यात आणण्यात येणार असून फुरसुंगी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. फराटे यांच्या निधनाचे वृत्त येताच परिसरावर शोककळा पसरली होती. फराटे कुटुंबिय फुरसुंगी येथील गंगानगर भागातील गुरुदत्त कॉलनी येथे राहतात. त्यांच्या पश्चात आई,वडील,पत्नी,दोन मुली  आणि भाऊ असा परिवार आहे. फराटे कुटुंबात लष्कराची परंपरा आहे. त्यांचा धाकटा भाऊ सैन्य दलात सेवा बजावतो आहे.