दिल्लीत जेरबंद केलेला दहशतवादी धारावीतील; गृहमंत्र्यांनी बोलवली तातडीची बैठक

मुंबई: दिल्लीमध्ये काल 6 दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी धारावातील असल्याची माहीती मिळाली अन् राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या दहशतवाद्यांचा मुंबईची लोकल उडवण्याचा प्लॅन असल्याचं उघड झाल्याने गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आता अ‍ॅक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळाले आहेत. वळसे-पाटील यांनी तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला एटीएसचे अधिकारीही उपस्थित राहणार आहेत. तर दुसरीकडे रेल्वेनेही उच्चस्तरीय बैठक बोलावली असल्याची माहीती मिळाली आहे.

दिल्लीत सहा अतिरेक्यांना अटक करण्यात आली. ही संवेदनशील घटना आहे. देशाच्या स्तरावरील ही घटना आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाची बैठक बोलावण्यात आली आहे. मात्र, या बैठकीतील कायदेशीर माहिती घेतल्यानंतरच त्यावर अधिक भाष्य करता येईल. आताच काही बोलणं योग्य होणार नाही, असं दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमाशी बोलताना सांगितलं आहे.

दरम्यान, अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांचा संबंध अंडरवर्ल्डशी असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच यातील 2 दहशतवादी डी-गँगशी संबंधित असल्याचीही माहिती मिळत आहे. सध्या देशात सणांची धूमधाम सुरु आहे. सणांमुळे देशात अनेक ठिकाणी गर्दी होते. याच गर्दीच्या पार्श्वभूमीवर बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा प्लॅन होता. तो पोलिसांनी उधळून लावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या